- प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना’अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार १५ डिसेंबर २०२५ पूर्वी सर्व राज्यांमधील शासकीय इमारतींचे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी दिले. शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत हा एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात आढावा बैठक पार पडली.
(हेही वाचा – Pune GBS : केंद्र सरकारचं सात तज्ज्ञांचं पथक पुण्यात ; जीबीएसचा धोका लक्षात घेता विहिरींवर लावणार विशेष यंत्रणा)
राज्यातील ११५७ शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित
यावेळी उपमुख्यमंत्री पवार (DCM Ajit Pawar) म्हणाले की, राज्यातील ११५७ शासकीय इमारतींवर सौर रूफटॉप प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. तथापि, उर्वरित ३३२ शासकीय इमारतींवर हे प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत. या योजनेतील कामे अधिक गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार व्हावीत, याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाऊर्जा विभागाला सूचना देताना ते म्हणाले की, इमारतीवर ज्या दिवशी सौर पॅनल बसवले जाते, त्याच दिवशी विद्युत मीटर सुरू करावा. तसेच या योजनेसंदर्भात दर तीन महिन्यांनी बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – बुरखा घालून बोर्डाच्या परीक्षा देण्यावर बंदी घाला; Nitesh Rane यांचे राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना आवाहन)
पुणे जिल्ह्यातील प्रकल्पांचा आढावा आणि निधी मंजुरी
बैठकीत पुणे जिल्ह्यातील शासकीय इमारतींवर कार्यान्वित होत असलेल्या सौर प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रलंबित प्रकल्पांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी दिले.
(हेही वाचा – राज्यात बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा गंभीर; उपाययोजना करण्याचे गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांचे आश्वासन)
बैठकीला वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा महाऊर्जाच्या महासंचालक आभा शुक्ला, महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. त्रिगुण कुलकर्णी, जिल्हाधिकारी, पुणे जितेंद्र डूडी (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे) आणि ऊर्जा, वित्त विभागाचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community