गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने प्रति लिटर पेट्रोलमागे ५ रूपये तर डिझेलमागे १० रूपये कमी केल्याने सामान्य नागरिकांनी सुटकेसा निःश्वास टाकला आहे. वाढत्या महागाई दरम्यान, इंधनदर कमी केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरच्या आणि डिझेलवरच्या अबकारी करामध्ये घट केल्याने इंधनाच्या कमी झाल्या आहेत. मात्र आता राज्यानेही आपल्या व्हॅट करात कपात करावी, असंही आवाहन केंद्राकडून करण्यात आले आहे. अशातच आता राज्याने वॅट कमी करुन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी महाविकास अघाडी सरकारकडे अखिल भारतीय मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने करत महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
वाहतूक संघटनाही आक्रमक
केंद्राने पेट्रोल डिझेलचे दर कमी केले आहेत आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीने राज्यातील कर कमी करावे अशी मागणी सर्वच विरोधीपक्षनेते करत आहेत, आता या मागणीसाठी वाहतूक संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. काँग्रेसच्याच संघटनेने राज्यसरकारवर ताशोरे ओढल्याने हा विषय विरोधीपक्षांसाठी चर्चेचा बनला आहे.
मविआला घरचा आहेर
'मुख्यमंत्री महोदय, डिझेल स्वस्त करा'
वाहतूकदार संघटनेचा मविआ सरकारकडे आग्रह
अखिल भारतीय मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे निवेदन
मुख्यमंत्र्यांना कळवले आसपासच्या राज्यातले डिझेल दर#HindusthanPostMarathi #Maharashtra #MVA #DieselPrice @CMOMaharashtra pic.twitter.com/xxybjjyWav— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) November 7, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अखिल भारतीय मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने निवेदन दिले आहे. तसेच याप्रकरणी जय महाराष्ट्र या मराठी वृत्तवाहिनीला संघटनेच्या चेअरमनने प्रतिक्रियाही दिली आहे. यामध्ये त्यांनी केंद्राने इंधन दर कमी केल्यानंतर इतर राज्यांनी कमी केलेले दर सांगितले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक, उत्तराखंड, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, बिहार या भाजप शासित राज्यांनी त्यांच्या व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या राज्यातील नागरिकांना आता तुलनेने स्वस्त दरात पेट्रोल मिळणार आहे.
वसूली आणि टक्केवारी या दोन शब्दांत मुख्यमंत्र्यांचे कान उघडण्याची क्षमता आहे. बाकी त्यांना काहीच ऐकू येत नाही. https://t.co/J4dkybTRXL
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 7, 2021
(हेही वाचा – ‘त्या’ पार्टीचे अस्लम शेख यांनाही निमंत्रण, तरीही ते गप्प का?)
भाजपाचा मुख्यमंत्र्यावर निशाणा
अखिल भारतीय मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने महाविकास अघाडी सरकारकडे राज्याने वॅट कमी करून जनतेला दिलासा द्यावी, अशी मागणी केल्यानंतर यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. वसूली आणि टक्केवारी या दोन शब्दांत मुख्यमंत्र्यांचे कान उघडण्याची क्षमता आहे. बाकी त्यांना काहीच ऐकू येत नाही. अशी टीका भातखळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
Join Our WhatsApp Community