MTDC ची पर्यटनस्थळांवरील सर्व निवासस्थाने फुल्ल

74

नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांनी भरलेली आहेत. त्यामुळे त्या त्या पर्यटनस्थळांवरील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (MTDC) निवासस्थाने फुल्ल झाली आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा आणि आरोग्यपूर्ण सुविधा देण्याबरोबरच निखळ पर्यटनाचा, निसर्गाचा आणि अप्रतिम खाद्यपदार्थांचा आस्वाद देण्यासाठी सज्ज झाले आहे.

यंदाच्या वर्षी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी महामंडळाची (MTDC) सर्वच पर्यटक निवासस्थाने हाऊसफुल्ल झाली आहेत. पर्यटन महामंडळ निवासस्थानांमध्ये निसर्गाचे भान ठेवून जबाबदारीने पर्यटन करण्यासाठी विनंती करणार आहे. पर्यटकांना पर्यटनविषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहिती, आसपासच्या निसर्गाची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत (MTDC) पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहिती वेबसाईट, फेसबुकच्या माध्यमातून देण्यात येत आहे. आताच महामंडळाच्या पर्यटक निवासांचे 100 टक्के आरक्षण फुल्ल झाले आहे.

(हेही वाचा Simhastha Kumbh Mela च्या कामांचा आराखडा सादर करा; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत दिले आदेश)

छत्रपती संभाजीनगर विभागातील अजंठा (फर्दापूर), लोणार, नाशिक विभागातील ग्रेप पार्क, भंडारदरा, पुणे विभागातील महाबळेश्वर, लोणावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, गणपतीपुळे या ठिकाणी पर्यटकांची मुख्य आकर्षण ठरत आहेत. दरम्यान, सध्याच्या वातावरणात पर्यटकांना आयुर्वेदिक आणि नैसर्गिक खाद्यपदार्थ आणि वातावरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यटकांना स्वच्छ आणि रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, प्राचीन मंदिरे आणि संस्कृती, हिरवागार निसर्ग, अप्रतिम खाद्यपदार्थ यांची मेजवानी देण्यासाठी महामंडळ आतुरतेने वाट पाहात होते. आता महामंडळाची निवासस्थाने फुल्ल झाली आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.