love jihad : उत्तर प्रदेशातील ‘आफताब’नेही हिंदू युवतीचे तुकडे शेतात पुरले, पण दोन वर्षांनी असे घडले…

184

आफताबने लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा निर्घृण खून केला, तिच्या शरीराचे ३६ तुकडे केले, ही प्रकरण तापलेले असतानाच उत्तर प्रदेशातील साकिबनेही असाच हिंदू युवतीचा लव्ह जिहादच्या माध्यमातून खून केला होता, ज्याची जामिन्यावर सुटका झाली, हा दुर्दैवी योगायोग म्हणावा लागेल.

कुत्र्याच्या तोंडात माणसाचा हात दिसला आणि…

पंजाबमधील लुधियाना येथील रहिवासी असलेल्या हिंदू युवतीची साकिब आणि त्याच्या परिवारांसह ९ आरोपींनी ५ जून २०१९ रोजी मेरठमध्ये हत्या केली होती. १३ जून २०१९ रोजी हा खून उघडकीस आला. ज्यावेळी ईश्वर पंडित या व्यक्तीने एक कुत्रा माणसाचा हात तोंडात घेऊन उसाच्या शेतातून पळताना पाहिला, तेव्हा संशय आला आणि शेतात खोदकाम केले असता त्या हिंदू युवतीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे अनेक तुकडे करून शेतात पुरण्यात आले होते. मात्र दोन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी या प्रकरणाची सुनावणी सुरू झालेली नाही. आर्थिक परिस्थिती हलाख्याची असल्यामुळे युवतीच्या कुटुंबियांना मेरठ दूर असल्याने ते खटला चालवू शकले नाही. डीएनए सॅम्पल दिल्यानंतर आजतागायत न्यायालय किंवा पोलिसांकडून युवतीच्या कुटुंबियांना एकही कागद देण्यात आला नाही, अर्थात त्यांना या खटल्याची काहीच माहिती देण्यात आली नाही. त्या हिंदू युवतीच्या घरातील सर्व सोने साकिबने बळकावले होते, जे अद्याप सापडलेले नाही, असे युवतीच्या आईचे म्हणणे आहे.

(हेही वाचा औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार जलील यांच्याकडून जबरदस्तीने धर्मांतराचा प्रयत्न?)

असा साकिब बाहेर आला

या प्रकरणातील मुख्य आरोपी साकिबच्या जामीन अर्जावर अलाहाबाद उच्च न्यायालयात १३ जानेवारी २०२१ रोजी सुनावणी झाली. न्यायमूर्ती प्रदीप कुमार श्रीवास्तव यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. त्याच्या बचावात, साकिबने असा युक्तिवाद केला की मृत व्यक्ती तिच्या स्वतःच्या इच्छेने त्याच्यासोबत पळून गेली होती आणि आनंदाने जगत होती. आपली पार्श्वभूमी गुन्हेगारी नसल्याची माहितीही साकिबने न्यायालयात सादर केली. साकिबच्या युक्तिवादाशी सहमती दर्शवताना, साकिबला तुरुंगात ठेवण्यासाठी पोलिसांकडे कोणतेही ठोस पुरावे नसल्याच्या युक्तिवादाच्या आधारे न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले होते. शाकिबच्या जामीनापूर्वी सुटलेल्या इश्मतसोबत मुस्तकीम आणि मुशर्रतचा जामीनही आधार म्हणून कामाला आला. मुख्य आरोपी साकिबची सुटका झाल्यानंतर उर्वरित ५ आरोपीही वेगवेगळ्या तारखांना जामिनावर बाहेर आले.

(हेही वाचा ट्रेनच्या बोगीत मुसलमान नमाज पठण करतात, मंत्रोच्चार करणाऱ्या माजी सैनिकाला मात्र मारहाण करतात)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.