सर्व राष्ट्रीय महामार्ग येत्या डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याचं धोरण आखलं जात असल्याचं प्रतिपादन माहिती आणि केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी हि माहिती दिली.
लवकरच खड्डेमुक्त राष्ट्रीय महामार्ग हे एक वास्तव असेल. प्रकल्प यशस्वी करण्यासाठी तरुण अभियंत्यांना प्रकल्पात सामील करून घेतलं जाईल, पावसामुळे महामार्गावर खड्डे पडून नुकसान होऊ नये, याकडेही नवीन धोरण लक्ष देणार आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले. रस्तेबांधणीत महापालिकेचा कचरा वापरण्यासाठी सरकार आणखी एका राष्ट्रीय धोरणावर काम करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
(हेही वाचा – Asian Games 2023 : सहाव्या दिवसाची सुवर्ण पदक जिंकून सुरुवात; भारताची एकूण २७ पदकांची कमाई)
Join Our WhatsApp Community