सध्या सीबीएसई आणि आयसीएसई व्यतिरिक्त देशातील विविध राज्यांमध्ये राज्य मंडळाच्या परीक्षांचा वेगवेगळा दर्जा आहे आहे. त्यामुळे मुलांच्या गुणांमध्येही फरक पडतो. या कारणास्तव विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्या पातळीवर केले जात नाही. नीट, जेईई, सीयूईटीनंतर आता बोर्डाच्या परीक्षांमध्ये मोठा बदल होणार आहे. भारत सरकार हा मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे.
PARAKH संस्थेची निवड
या बदलासाठी PARAKH या नव्या परीक्षा नियामक संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या स्तरावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी एकसमान आराखडा तयार करणे, हा यामागील उद्देश आहे. सध्या सीबीएसई आणि आयसीएसई व्यतिरिक्त देशातील विविध राज्यांमध्ये राज्य मंडळाच्या परीक्षांचा स्तर वेगवेगळा आहे. यामुळे मुलांच्या गुणांमध्येही मोठा फरक पडतो. याच कारणास्तव विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्याच पातळीवर केले जात नाही. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) राज्यांच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेबरोबर (एससीईआरटी) अनेक बैठका घेतल्या आहेत. या बैठकांचा परिणाम म्हणून, एक नवीन मूल्यांकन नियामक तयार केला जात आहे, ज्याचे नाव PARAKH आहे.
समान नियम, मानके, मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार
PARAKH ही संस्था एनसीईआरटीचा एक भाग म्हणून काम करेल. या PARAKH मध्ये देशातील सर्व मान्यताप्राप्त शाळांसाठी समान नियम, मानके, मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येणार आहेत. मूल्यमापनाचा नमुना अशा प्रकारे ठेवला जाईल की मुलांना 21 व्या शतकात आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास आणि मूल्यमापन करता येईल. बहुतेक राज्ये वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेण्याच्या एनईपीच्या प्रस्तावाला पाठिंबा देत आहेत. यापैकी एका परीक्षेच्या मदतीने मुले त्यांचे गुण सुधारण्यास मदत करतील.
Join Our WhatsApp Community