Supreme Court : काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाचे (Delhi High Court) न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घराला आग लागल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रक्रियेदरम्यान कोट्यवधींची रोकड मिळाली होती. त्यानंतर संपूर्ण देशात हा विषय चर्चेचा ठरला होता. उच्च न्यायालयाच्या (High Court) न्यायाधीशाकडे कोट्यवधीची रोकड कुठून आली, असा सवाल विचारला जाऊ लागला. असे असतानाच सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा म्हणून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपापली संपत्ती जाहीर (Judge declares wealth) करणार आहेत. दरम्यान व्यवहारात पारदर्शकता आणि न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी पदभार स्वीकारताना त्यांच्या मालमत्तेचा तपशील सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. (Supreme Court)
(हेही वाचा – Fire : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू कक्षात आग)
मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत सर्व 34 न्यायाधीशांनी भारताचे सरन्यायमूर्ती संजीव खन्ना (chief Justice Sanjeev Khanna) यांच्या उपस्थितीत त्यांची मालमत्ता जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायमूर्तीच्या मालमत्तेशी संबंधित तपशील सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केले जातील. तसेच वेबसाइटवर मालमत्तेची घोषणा ऐच्छिक असेल.
(हेही वाचा – वक्फ दुरुस्ती विधेयकामुळे गरिबांच्या जमिनींचे संरक्षण; मंत्री Mangal Prabhat Lodha म्हणाले…)
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तींची निर्धारित संख्या 34 असून सध्या 33 न्यायमूर्ती आहेत, एक पद रिक्त आहे. यापैकी 30 जणांनी त्यांच्या मालमत्तेची घोषणा न्यायालयात सादर केली आहे. मात्र न्यायाधीशांनी दिलेल्या संपत्तीची माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. फक्त ज्या न्यायाधीशांनी आतापर्यंत संपत्तीची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिलेली आहे, त्यांची नावे संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहेत. न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई, न्यायमूर्ती सूर्यकान्त, न्यायमूर्ती अभय.एस. ओका, न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी, न्यायमूर्ती बी.वी. नागरत्ना आणि इतर न्यायमूर्तींचा समावेश आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community