राज्यावरील मंकी पॉक्सचे संकट तुर्तास टळले

राज्यात मुंबईपाठोपाठ इतर भागांतील दहा संशयित रुग्णांच्या तपासणीतील मंकी पॉक्सचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. दहापैकी दोन रुग्णांचा अहवाल पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून प्रलंबित होता. अखेर शुक्रवारी उर्वरित दोन्ही रुग्णांना मंकी पॉक्स झाला नसल्याचे तपासाअंती आढळले.

( हेही वाचा : राज्यात पुन्हा बीए व्हेरिएटंचे ३६ रुग्ण )

मंकी पॉक्सचे नमुने निगेटिव्ह

मुंबईत गेल्या १५ दिवसांत दोन संशयित मंकी पॉक्सचे रुग्ण होते. मात्र दोघांनाही मंकी पॉक्स झाला नसल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी एका रुग्णाच्या नमुन्याची तपासणी पाच दिवसांपूर्वी कस्तुरबा रुग्णालयातच केली गेली. आता पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेसह कस्तुरबा रुग्णालयातही मंकी पॉक्सची तपासणी केली जाईल. तपासणीसाठीची आवश्यक साधने दिल्लीतील इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या केंद्रीय संस्थेने कस्तुरबा रुग्णालयाला दिल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी दिली. या दोन प्रयोगशाळांसह नागपूरातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेतही आता मंकी पॉक्सची चाचणी केली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here