राज्य सरकारचे ‘मिशन अनलॉक’: आता थिएटर्सचे दरवाजेही उघडणार

राज्यातील कोरोनाचा ताप कमी होत असल्याने, राज्य सरकारने राज्यात अनलॉक करायला धडाक्यात सुरुवात केली आहे. शुक्रवारी राज्यातील शाळा आणि धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सिनेमागृहे आणि नाट्यगृहे येत्या 22 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

काय आहे निर्णय?

येत्या 22 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व चित्रपट व नाट्यगृहे सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवासस्थानी घेण्यात आलेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोरोना नियमांचे काटोकोरपणे पालन करण्याच्या सूचना सर्व चित्रपट आणि नाट्यगृहांना देण्यात येतील. त्याबाबतची नियमावली लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. ही माहिती देणारे ट्वीटही मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

(हेही वाचाः ‘या’ तारखेला वाजणार राज्यातल्या शाळांची घंटा! कुठल्या इयत्तांचे वर्ग सुरू होणार? वाचा)

रंगकर्मींना दिलासा

तिसरी घंटा कधी होणार आणि रंगभूमीचा पडदा पुन्हा कधी उघडणार या प्रतीक्षेत गेल्या काही महिन्यांपासून रंगकर्मी होते. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे या सर्व कलावंतांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.

अनलॉकला वेग

कोरोनाची परिस्थीती लक्षात घेता राज्यातील थिएटर्स बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे नाट्यगृह आणि सिनेमागृह यांचं खूप नुकसान होतं होत. कोरोनाचे नियम शिथील केल्यानंतर ब-याच गोष्टी पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळेच आता अनलॉकच्या प्रक्रियेला वेगाने सुरुवात झाल्याचे दिसत आहे.

(हेही वाचाः घट बसणार, मंदिरे उघडणार! राज्य सरकारचा मोठा निर्णय)

मंदिरांचेही दार उघडले बया

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे कोरोनाविषयक नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळे एकप्रकारे राज्यातील जनतेला देवीच पावली असे म्हणावे लागेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here