मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार! सगळ्या लोकल AC होणार, पंतप्रधान कार्यालयाने दिले आदेश 

113

मुंबई उपनगरीय रेल्वेचे जाळे संपूर्ण वातानुकूलित करण्याच्या २० हजार कोटींच्या प्रकल्पाला प्राधान्य देण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालयाने दिले असून त्यासाठी लवकरच केंद्रीय अर्थखात्याची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा : *#0*#, *#06# तुमच्या स्मार्टफोनमधील हे सीक्रेट कोड तुम्हाला माहिती आहेत का? एकदा नक्की डायल करा )

पंतप्रधान कार्यालयाने दिले आदेश 

अलिकडेच एसी लोकलचे दर निम्मे केल्यामुळे प्रवाशांनी एसी लोकल प्रवासाला पसंती दिली आहे. एसी लोकलमुळे दरवाज्यामधून लटकून होणारे अपघात बंद झाले आहेत. यामुळे मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या माध्यमातून २३८ वातानुकूलित लोकल खरेदी करण्यात येणार आहेत. याता लाभ संपूर्ण मुंबईकरांना घेता येणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे संपूर्ण एसी करण्याच्या २० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला प्राधान्य द्या असे आदेश पंतप्रधान कार्यालयाने दिले आहेत.

एसी लोकलच्या तिकीट दरात कपात केल्यापासून पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलप्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली होती. दरम्यान दुसरीकडे हार्बर रेल्वे मार्गावरील एसी लोकलला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही म्हणून हार्बर मार्गावरील एसी लोकलसेवा बंद करून ती मध्य मार्गावर वळवण्यात आली होती. तसेच येत्या काळात लोकल एसी लोकलला अधिक पसंती देतील असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

उरण – खारकोपर सेवा

बेलापूर – खारकोपर – उरण या मध्य रेल्वे मार्गावरील चौथ्या रेल्वे मार्गाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन महिन्यात या नव्या मार्गाचे लोकार्पण होईल असे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.