महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १०० टक्के, तर अन्य विविध विभागांतील ५० टक्के जागा भरण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विधान परिषदेमध्ये दिली.
( हेही वाचा : कोकणात २७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी )
२४ ऑगस्ट या दिवशी आमदार अरुण लाड यांनी शासनाच्या २९ प्रमुख विभागांतील २ लाख १९३ जागा रिक्त असल्यामुळे नागरिकांना शासकीय सेवा वेळेत मिळत नसल्याची लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली. त्यावर शासनाच्या वतीने मंत्री शंभुराज देसाई यांनी उत्तर दिले. यावेळी अरुण लाड यांनी लक्षवेधीमध्ये शासकीय नोकरभरती खासगी ठेका पद्धतीऐवजी राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्याची मागणी केली.
खासगी आस्थापनांच्या माध्यमातून नोकरभरती करणार नाही
राज्यातील एकूण दीड लाख पदे रिक्त असून ७५ हजार पदे भरण्याची प्रक्रिया केली जाईल. कोरोना महामारीच्या काळात नवीन नोकर भरतीवर निर्बंध घालण्यात आले होते. आता हे निर्बंध शिथील केले आहेत. यापुढे कोणत्याही खासगी आस्थापनांच्या माध्यमातून नोकरभरती केली केली जाणार नाही.
Join Our WhatsApp Community