उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अजानसाठी भोंगे लावणे हा मुलभूत अधिकार नाही

भोंग्यांबाबत अलाहाबाद न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. अजानसाठी भोंगे लावणे हा मुलभूत अधिकार नाही, असे अलाहाबाद न्यायालयाने म्हटले आहे. मशिदीबाबतच्या भोंग्यांवर न्यायालयाचा हा मोठा निर्णय आला आहे.

याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

उत्तर प्रदेशातील बधायू जिल्ह्यातील जिल्हाधिका-यांनी तिथल्या मशिदींवर लाऊड स्पीकरसाठी परवानगी नाकारली  होती, त्यानंतर तिथले मुथवल्ली इरा खान उच्च न्यायालयात गेले होते. त्यांनी जिल्हाधिका-यांसह आणखी तीन लोकांना यात पक्षकार बनवले होते. त्यांनी याचिकेत म्हटले होते की, अजानसाठी मशिदींवर भोंगे लावणे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ही बाब पूर्णपणे नाकारली आहे. मशिदीवर अजानसाठी अशाप्रकारे भोंगे लावणे हा  मुलभूत अधिकार नाही हे या याचिकेदरम्यान, उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आणि त्यामुळे महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशभरात हा वाद गाजत असताना, अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय महत्त्वाचा आहे.

( हेही वाचा: सीईटीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी ‘या’ तारखेपर्यंत करु शकता अर्ज )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here