श्रीकृष्ण जन्मभूमीवरील अतिक्रमणाच्या प्रकरणी Allahabad High Court ने मुसलमान पक्षाची याचिका फेटाळली

147
श्रीकृष्ण जन्मभूमीवरील अतिक्रमणाच्या प्रकरणी Allahabad High Court ने मुसलमान पक्षाची याचिका फेटाळली
श्रीकृष्ण जन्मभूमीवरील अतिक्रमणाच्या प्रकरणी Allahabad High Court ने मुसलमान पक्षाची याचिका फेटाळली

मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीवरील इस्लामी अतिक्रमणाच्या प्रकरणी मुसलमान पक्षाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) गुरुवार, १ ऑगस्ट रोजी हा निर्णय दिला. हिंदू पक्षाने दाखल केलेल्या 18 याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार असल्याचे उच्च न्यायालयाने या वेळी सांगितले. न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला. मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी (Sri Krishna Janmabhoomi) हे भगवान श्रीकृष्णाचे गर्भगृह आहे, ती मशीद नाही, अशी याचिका हिंदु पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

(हेही वाचा – SC Reservation : अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणात होणार वर्गीकरण; Supreme Court ने बदलला आपलाच निकाल)

त्याच वेळी, मुस्लिम बाजूने असा युक्तिवाद केला होता की, मशिदीसाठी जागा 1968 मध्ये झालेल्या करारानुसार देण्यात आली होती. 60 वर्षांनंतर झालेल्या कराराला चुकीचे म्हणणे योग्य नाही. हिंदू बाजूच्या याचिका सुनावणीच्या योग्य नाहीत. मात्र, हायकोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मुस्लीम पक्षाचा हा युक्तिवाद ग्राह्य धरला नाही. आता हिंदू पक्षाच्या 18 याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे. बहुतांश याचिकांचे स्वरूप सारखेच आहे.

आयोगाच्या सर्वेक्षणासाठी हिंदू पक्ष सुप्रीम कोर्टात जाणार – अ‍ॅड. विष्णुशंकर जैन

पहिली याचिका 25 सप्टेंबर 2020 रोजी दाखल करण्यात आली होती. तब्बल 4 महिने सुनावणी झाली. आज उच्च न्यायालयाने 18 याचिका सुनावणीस योग्य मानल्या. आता या प्रकरणी सुनावणी होणार आहे. आम्हाला पुरावे सादर करण्याची संधी मिळेल. वकील आयोगाच्या सर्वेक्षणासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. लवकरच आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. श्रीकृष्णजन्मभूमीतील ईदगाहचा मुद्दा आणि आयोगाचे सर्वेक्षण पुनर्संचयित करण्याची मागणी वकील करणार आहेत, असे हिंदू पक्षाचे वकील विष्णुशंकर जैन (Vishnu Shankar Jain) यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी प्रार्थनास्थळांचा कायदा किंवा वक्फ बोर्ड कायदा लागू होत नाही. सध्या ज्या ठिकाणी शाही ईदगाह मशीद आहे ती श्रीकृष्ण जन्मभूमी आहे. करारानुसार मंदिराची जमीन शाही ईदगाह समितीला देण्यात आली असून, ती नियमांच्या विरोधात आहे, असा युक्तीवाद हिंदु पक्षाच्या वतीने करण्यात आला.

मथुरा (Mathura) कोर्टात दाखल केलेली याचिका सुनावणीयोग्य नाही. या प्रकरणाला वक्फ कायद्यासह प्रार्थनास्थळ कायदा 1991 आणि मर्यादा कायद्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणी कोणतीही याचिका दाखल करता येणार नाही किंवा त्यावर सुनावणी करता येणार नाही, असा दावा शाही ईदगाह कमिटीच्या वकिलांनी केला होता. हिंदु पक्षाच्या वकिलांना हा युक्तीवाद खोडून काढला.

काय आहे श्रीकृष्ण जन्मभूमीवरील अतिक्रमणाचा वाद ?

मथुरा शहरातील श्री कृष्ण जन्मभूमी मंदिर परिसराला लागून शाही ईदगाह मशीद आहे, हे ठिकाण भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान मानले जाते. औरंगजेबाने श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी बांधलेले केशवनाथ मंदिर पाडून शाही ईदगाह मशीद बांधली असे मानले जाते. मथुरेतील संपूर्ण मंदिर 13.37 एकर जमिनीत पसरलेले आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर सुमारे 11 एकरावर बांधले आहे. शाही ईदगाह मशिदीचे अतिक्रमण 2.37 एकरवर करण्यात आले आहे. याचिकेत ईदगाह हटवून ही जमीन मंदिराला देण्याची मागणी करण्यात आली असून श्रीकृष्ण मंदिराचे गर्भगृह मशिदीतच असल्याचा हिंदू पक्षाचा दावा आहे. जमिनीबाबत 1968 मधील करार रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.