Mill Worker : गिरणी कामगारांसाठी पाच हजार घरांची सोडत

177
Mill Worker : गिरणी कामगारांसाठी पाच हजार घरांची सोडत
Mill Worker : गिरणी कामगारांसाठी पाच हजार घरांची सोडत

मुंबईतील गिरणी कामगारांच्या Mill Workerघरांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी आमच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी तीन महिन्यात पात्र-अपात्रेची कार्यवाही झाल्यानंतर गिरणी कामगारांना जास्तीत जास्त घर कशी उपलब्ध होतील, यासाठी सरकारने पावले उचलली आहेत, तर सुमारे पाच हजार घरांची लॉटरी काढली जाईल आणि गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. वर्षा बंगल्यावर गिरणी कामगारांच्या घरांविषयी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळाले पाहिजे, अशी मागणी आहे. त्याच दृष्टीने आमचे सरकार स्थापन झाल्यापासून म्हाडाच्या माध्यमातून अनेक घरांच्या लॉटऱ्या काढण्यात आल्या. तर आज गिरणी कामगारांना जास्तीत जास्त घरांचा स्टॉक कसा उपलब्ध होईल, यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. म्हाडा सह अन्य विभागांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून ते विविध माध्यमांतून घरांसाठी जागा उपलब्ध करण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल.

हेही वाचा : Sharad Pawar : शरद पवार कुणाचे? लेकीचे की पुतण्याचे?)

तीन महिन्यात पात्र-अपात्र प्रक्रिया 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आगामी तीन महिन्यांत गिरणी कामगार घरांसाठी पात्र-अपात्रतेची कार्यवाही केली जाईल. त्यानंतर जास्तीत जास्त घरांची संख्या कशी उपलब्ध होईल याकडे देखील तेवढीच तत्परतेने कारवाई केली जाईल. त्यानंतर गिरणी कामगारांना हक्काच्या घरासाठी सोडत काढली जाईल. आजच्या या बैठकीत सर्व बाबींवर निर्णय घेण्यात आलेले आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील माझी चर्चा झालेली आहे. त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार करणारे हे सरकार आहे. त्यांना जरूर न्याय दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.