राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयावर टीका केली असता, राज्य सरकारच्या मंत्र्यांचं म्हणणं आहे की, हा निर्णय शेतक-यांच्या हिताचा आहे. शेतक-यांच्या द्राक्षांना या निर्णयामुळे मागणी वाढणार आहे. आता सरकारच्या याच निर्णयावर टीका करत, एका शेतक-याने गांजाची शेती करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना ई-मेल करुन परवानगी मागितली आहे.
म्हणून परवानगी द्यावी
नांदेडचे शेतकरी अविनाश अनेराये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गांजाच्या शेतीला परवानगी मिळण्यासंदर्भात ई-मेल केला आहे. राज्यातल्या शेतक-यांवर आर्थिक संकट कोसळत चाललं आहे. त्यात कोविड आणि काही विभागात कडाक्याची थंडी आणि गारांचा पाऊस यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरी आपण सरसकट शेतक-यांना गांजा लागवडीसाठी सशर्त परवानगी देऊन, त्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सहकार्य करावे, असं या ई-मेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
( हेही वाचा: दहावी बारावीच्या परीक्षा मार्च की एप्रिलमध्ये ? काय म्हणाल्या वर्षा गायकवाड? )
भाजपाचा विरोध
राज्यातील द्राक्ष बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना देण्यासाठी आता सुपर मार्के्ट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शैक्षणिक आणि धार्मिक स्थळांच्या जवळ मात्र वाइन विक्रीला परवानगी मिळणार नाही. भाजपने या निर्णयाला विरोध केला आहे.
Join Our WhatsApp Community