सध्या देशभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु आहे, १ मे पासून देशभरात १८ ते ४४ वयोगटातील समाजघटकांसाठी लसीकरण सुरु झाले आहे. मात्र त्यासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आली आहे. परंतु या कोविन ॲपमध्ये प्रचंड अडचणी येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासाठी स्वतंत्र ॲप बनवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
कोविन ॲपमध्ये काय आहेत अडचणी?
सध्या राज्यात केंद्राच्या आदेशानुसार लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु केला आहे, त्याकरता सरकारच्या निर्देशानुसार या लसीकरणासाठी केंद्र सरकारच्या कोविन ॲपवर नोंदणी अनिवार्य केली आहे. परंतु या कोविन ॲपवर नोंदणी करताना बऱ्याच अडचणी येत आहेत. अनेकांची नोंदणी होत नाही, तर एकाच वेळी अनेकजण नोंदणी करतात, त्यामुळे साईट बंद होते, तर काहींना लस मिळाली नाही तरी त्यांना लस दिल्याचा संदेश प्राप्त होतो, अशा प्रकारे सरकारच्या या कोविन ॲपमध्ये अडचणी येत आहेत, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा : डॉ. गुप्ताच्या विरोधात गुन्हा दाखल! ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या बातमीचा परिणाम )
याआधीच मुख्यमंत्र्यांनी दिलेले सूतोवाच!
त्यामुळे महाराष्ट्रासाठी स्वतंत्र ॲप विकसित करण्याची परवानगी केंद्र सरकारने द्यावी, जेणेकरून राज्याचे लसीकरण आणि नोंदणी यात सुसूत्रता येईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील आठवड्यात राज्यातील जनतेला संबोधित करताना राज्य सरकार हे केंद्र सरकारकडे लसीकरणासाठी नोंदणी करण्याकरता स्वतंत्र ॲप विकसित करण्यासाठी परवानगी मागण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते.
Join Our WhatsApp Community