मुंबईतील नवरात्रोत्सव मंडळ आणि छटपूजा आयोजक मंडळ यांची संयुक्त बैठक बुधवारी दुपारी दोन वाजता महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत या दोन्ही उत्सवांचे संपूर्ण नियोजन महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने करावे असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असल्याचे मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी जाहिर केले. विशेष म्हणजे नवरात्रोत्सवामध्ये महापालिकेच्यावतीने आवश्यक ती परवानगीसह व्यवस्थाही केली जात असताना भाजपने याबाबत आपण बैठक घेऊन हा निर्णय महापालिकेला घेण्यास भाग पाडल्याचा दावा केला आहे. (Navratri Festival 2023, Chhath Puja)
मुंबई शहरात १२०० हून अधिक नवरात्री मंडळे ही दरवर्षी अधिकृतरित्या परवानगी घेतात तसेच मुंबई शहरात ८२ हून अधिक ठिकाणी छटपूजेचे आयोजन केले जाते. भाजपा मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार व महायुती सरकारचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई शहराच्या १५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच हिंदू सणाबाबत तातडीने हा निर्णय घेतल्याचा दावा भाजपने केला आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत लोढा आणि शेलार यांच्यासह नवरात्रौत्सव मंडळ व छटपुजा आयोजक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवक आणि अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते. (Navratri Festival 2023, Chhath Puja)
या बैठकीत नवरात्रोत्सावासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या गणेश उत्सवाच्या धर्तीवरच एक खिडकी योजनेमार्फत देण्यात येतील. बिगर व्यावसायिक नवरात्री मंडळासाठी परवानगी शुल्क, अग्निशमन शुल्क माफ केले जाईल. यासाठी गणपतीप्रमाणे नाममात्र अनामत रक्कम १०० रुपये आकारण्यात येईल. नवरात्रीत दसऱ्याला दुर्गा मूर्ती विसर्जन, गरबा विसर्जन यासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था, प्रकाशझोत दिवे, शौचालय, धुम्र फवारणी, स्वच्छता, निर्माल्य कलश इ. व्यवस्था गणेश विसर्जनाच्या धर्तीवर महापालिका प्रशासकीय विभागातर्फे उभारण्यात येईल. (NNavratri Festival 2023, Chhath Puja)
तसेच पोलीस प्रशासनाकडून महिलांच्या सुरक्षेची तसेच दागिन्यांच्या चोऱ्या होऊ नयेत म्हणून पुरेसा बंदोबस्त ठेऊन काळजी घेण्यात येईल. वाहतूक नियंत्रण व पार्किंग व्यवस्था याकडे विशेष लक्ष वाहतूक पोलीस देतील. दरवर्षी नवरात्रौत्सवामध्ये अशाप्रकारची व्यवस्था महापालिका प्रशासन विभाग स्तरावर तसेच विसर्जन स्थळांवर देत असते. त्यामुळे दरवर्षी प्रमाणेच ही व्यवस्था दिली जात असताना यासाठी भाजपने केवळ बैठकीची नौटंकी पार पाडत यांचे श्रेय आपल्या गळ्यात मारुन घेण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे. (Navratri Festival 2023, Chhath Puja)
(हेही वाचा – UBT Shiv Sena : ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईकरांची चिंता की वरळीची)
छठपुजेसाठीची व्यवस्था आधीपासूनच
छटपूजेसाठी आवश्यक कृत्रिम तलावांची व्यवस्था, प्रकाशझोत दिवे, शौचालय, धुम्र फवारणी, स्वच्छता, निर्माल्य कलश इ. व्यवस्था तसेच महिलांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र कक्ष अशी सर्व व्यवस्था प्रशासकीय विभागातर्फे करण्यात येईल. छटपूजेसाठी १९ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तसेच २० नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे सूर्योदयाच्यावेळी आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येईल, असे भाजपने प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून छठ पुजेसाठी काही ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात येतात. त्यासाठीची व्यवस्थाही महापालिका उपलब्ध करून देत असते. (Navratri Festival 2023, Chhath Puja)
मागील वर्षी शिवसेनेच्या मागणीनुसार ही व्यवस्था पुढे कायम ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला. परंतु बुधवारी पालकमंत्र्यांनी याबाबत आपण बैठक घेऊन याठिकाणी महापालिकेच्यावतीने व्यवस्था पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे ज्या नवरात्रोत्सवासह छटपुजेसाठी महापालिका आधीपासून व्यवस्था पुरवत आहे, याचेही श्रेय आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचे दिसून येत आहे. सदर बैठकीत मुंबई भाजपा उपाध्यक्ष पवन त्रिपाठी, माजी गटनेते प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, कमलेश यादव, विद्यार्थी सिंह, शीतल गंभीर-देसाई, दक्षा पटेल, प्रियांका मोरे, हरिष भांदिर्गे, सेजल देसाई तसेच मुंबई प्रवक्ता निरंजन शेट्टी आदी उपस्थित होते. (Navratri Festival 2023, Chhath Puja)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community