धक्कादायक! 66 रुग्णालयांचे फायर ऑडीटच नाही

147

राजापेठ येथील एका हॉटेलमध्ये आगलागून एका व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाला. त्यानंतर सरकारी दवाखान्यामध्येसुद्धा आगीच्या घटना घडल्या. या घटनांची दखल घेत महानगरपालिकेने सर्व शासकीय व खाजगी अशा २३४ दवाखान्यांना फायर ऑडिट करण्यासंदर्भात नोटीस दिल्या. त्यापैकी ६६ दवाखान्यांचे फायर ऑडिट नसल्याची धक्कादायक माहिती त्यातून समोर आलेली आहे. त्यामध्ये दोन सरकारी दवाखान्यांचासुद्धा समावेश आहे. दवाखान्यांनी फायर ऑडिटची प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर कारवाईचे संकेत मनपा प्रशासनाने दिले आहेत.

फायर ऑडिटची एनओसी नाही

यावर्षी डफरीन व पीडीएमसी येथे लहान मुलांच्या आयसीयुला आग लागल्याच्या घटना घडल्या. राजापेठ येथील एका हॉटेलमध्येसुद्धा आगीच्या घटनेत एका व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मनपाने दवाखान्यांना फायर ऑडिटची प्रक्रिया राबविण्याची नोटीस बजावली होती. मनपा क्षेत्रामध्ये २३४ खाजगी व शासकीय रुग्णालय आहे. त्यामध्ये १५७ रुग्णालयाजवळ, फायर ऑडिट असल्याचे दिसून आले. ९ दवाखान्यांचे अर्ज प्रक्रियेत आहेत. शहरात मोठे ४ दवाखाने शासकीय आहे. या शासकीय दवाखान्यांपैकी २ दवाखान्याजवळ फायर ऑडिटची एनओसी नसल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे ६६ दवाखान्यांजवळ एनओसी नसल्यामुळे या सर्व दवाखान्यांना नोटीस देण्यात आल्या. फायर ऑडिट नसलेला दवाखान्यांमध्ये आगीच्या घटना घडल्या तर त्याला कोण जबाबदार राहील, असा प्रश्न निर्माण होत आहे. यासोबतच शिकवणी वर्ग व शाळांमध्येसुद्धा फायर ऑडिट नसल्याने त्याकडेसुद्धा प्रशासन लक्ष केंद्रित करेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(हेही वाचा ‘भारत जोडो यात्रे’त आता ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा?)

रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष

महानगरपालिका क्षेत्रात जिल्हा महिला रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) व पीडीएमसी हे चार मोठे दवाखाने आहेत. त्यापैकी सुपर स्पेशालिटी व जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे एनओसी नसल्याचे दिसून आले. त्यावरून सरकारी दवाखाने कितपत सुरक्षित आहेत हे पुन्हा एकदा दिसून आले. विशेष म्हणजे डफरीन व पीडीएमसीला दोन वेळा आगीच्या घटना घडल्या. या घटनेमध्ये छोट्या मुलांचा होरपळून मृत्यू झाला. फायर ऑडिट असूनसुद्धा या ठिकाणी या घटना का घडल्या. या संदर्भात अद्यापही कुठलाच पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे मनपाने हॉस्पिटलला पत्र देऊनही रुग्णालय प्रशासनाने त्याला गंभीरतेने घेतलेले नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.