पाच दिवसांत 75 किलोमीटरचा रस्ता; ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड’मध्ये नोंद

अमरावती ते अकोला या राष्ट्रीय महामर्गाचे काम अवघ्या पाच दिवसांत पूर्ण झाले. या वेगवान कामाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नोंदही करण्यात आली आहे. 75 किलोमीटरचे अंतर असलेला हा राष्ट्रीय महामार्ग केवळ 5 दिवसांत राजपथ इन्फ्राकाॅन कंपनीकडून बांधण्यात आला.

अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामर्गाच्या कामासाठी 3 जूनला नारळ फोडण्यात आला आणि 7 जूनला हा महामार्ग तयारही झाला.

( हेही वाचा: Ghatkopar ward 130 : राखी यांच्यासमोर भाजपचा उमेदवार कोण? )

108 तास सलग काम 

अमरावती ते अकोला प्रवास करायचा असेल, तर कमरेचे लचके तुटतील अशा खराब अवस्थेत हा महामार्ग होता. दिवसागणिक या महामार्गावरील अपघातही वाढत होते. इतक्या खराब रस्त्याच्या बांधकामासाठी तीन वेळा टेंडर निघाला, परंतु कोणी काम केले नाही. अखेर पुण्याच्या  राजपथ इन्फ्राकाॅन कंपनीने हे काम हाती घेतले आणि अवघ्या पाच दिवसांत हा विक्रम करुन दाखवला. या रस्त्याच्या कामासाठी तीन शिफ्टमध्ये काम करण्यात आले. 750 हून अधिक मनुष्यबळाचा वापर या महामार्गाच्या बांधकामासाठी करण्यात आला. कुठेही न थांबता 108 तास काम करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here