Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेकरूचा 300 फूट खोल दरीत पडून मृत्यू, दुसरा जखमी

120
Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेकरूचा 300 फूट खोल दरीत पडून मृत्यू, दुसरा जखमी
Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेकरूचा 300 फूट खोल दरीत पडून मृत्यू, दुसरा जखमी

जम्मू कश्मीर येथे अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या यात्रेकरूचा 300 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी, 19 ऑगस्ट रोजी घडली. हा यात्रेकरू बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील रहिवासी होता.

विजय कुमार शाह असे या यात्रेकरूचे नाव आहे. ते ममता कुमारी असे नाव असलेल्या एका यात्रेकरूच्या सहकार्याने अन्य यात्रींसोबत कालिमाता मोरजवळ घसरले. यावेळी शहा यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अधिकारी आणि भारतीय लष्कराने यात्रेकरूंचा शोध घेण्याची मोहिम हाती घेतली होती. त्यावेळी शहा यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शाह यांचा मृतदेह बालटाल बेस कॅम्प रुग्णालयात नेण्यात आला. यादरम्यान एक यात्रेकरून जखमी झाले आहेत.

(हेही वाचा  – Manipur Violence : मणिपूरला दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न, स्वातंत्र्यदिनी केले बेकायदा शस्त्रप्रदर्शन)

ही वार्षिक तीर्थयात्रा 1 जुलै रोजी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटालच्या दुहेरी ट्रॅकपासून सुरू झाली. 31 ऑगस्ट रोजी या यात्रेची सांगता होणार आहे. दक्षिण काश्मीर हिमालयातील 3,888 मीटर उंच असलेल्या गुहेतील ही यात्रा 62 दिवसांची असते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.