अमरनाथ यात्रेला 1 जुलै 2023 पासून प्रारंभ होत आहे. 62 दिवस चालणारी यात्रा 31 अॉगस्टला समाप्त होणार आहे. शुक्रवार, 9 जून 2023 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावून यात्रेसाठी करण्यात आलेल्या सुरक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. श्री अमरनाथ जी श्राइन बोर्डाने यात्रेदरम्यान अनेक खाद्यपदार्थांवर प्रतिबंध घातला आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी जम्मू काश्मीरच्या उपराज्यपाल आणि सुरक्षासंस्थांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. वृत्तानुसार, या बैठकीला केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख तपन डेका, नॉर्दन कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ उपेंद्र द्विवेदी, सीआरपीएफचे महासंचालक एसएल थॉसन आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा Aurangzeb : औरंगजेबाचे फोटो अचानक झळकण्याला राजकीय वास; आमदार सत्यजीत तांबे)
अमरनाथ यात्रेसाठी या पदार्थांवर प्रतिबंध
श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाने यात्रेकरूंचे आरोग्य लक्षात घेऊन आरोग्यास हानिकारक पदार्थांवर बंदी घातली आहे. बोर्डाने खाद्यपदार्थांचा नवीन मेनू जाहीर केला आहे. हा फूड मेनू यात्रेकरूंना तसेच लंगर संस्था, खाद्यपदार्थांचे स्टॉल, दुकाने आणि यात्रा परिसरात खाद्यपदार्थ देण्यासाठी आणि विक्रीसाठी येणाऱ्या इतर आस्थापनांना लागू असेल. अमरनाथ यात्रा 2023 च्या नव्या खाद्यपदार्थ मेनूमध्ये धार्मिक कारण लक्षात घेऊन मांसाहार, दारु, तंबाखू, गुटखा, पान मसाला, धूम्रपान अशा सर्व अंमली पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. यात्रेकरूंना पुरी, छोले-भटुरा, पिझ्झा, बर्गर, भरलेले पराठे, डोसा, तळलेली रोटी, लोणीसह ब्रेड, लोणची, चटणी, तळलेला पापड, चौमीन, फ्राईड राईस आणि इतर तळलेले आणि कोणत्याही प्रकारचे फास्ट फूड खायला मिळणार नाहीत. याचबरोबर हलवा, जिलेबी, गुलाब जामून, लाडू, मिठाई आणि रसगुल्ले यांवरही प्रतिबंध घालण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community