अनन्य भक्ती आणि श्रद्धेचा संगम असलेल्या बाबा बुद्ध अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात झाली. या यात्रेला जाणारी पहिली तुकडी जम्मूहून कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रेकरिता शुक्रवारी सकाळी रवाना झाली.
10 दिवसांच्या या यात्रेचा प्रवास पूंछ जिल्ह्यातील तहसील मंडी टेकड्यांमधून सुरू होतो. यात्रेकरू समुद्रसपाटीपासून सुमारे 2,500 मीटर (8,200 फूट) उंचीवर असलेल्या अमरनाथ यात्रेच्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करतात. निसर्गरम्य ठिकाणी केलेली ही यात्रा अमरनाथ गुहेत समाप्त होते. यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी कडक सुरक्षा बंदोबस्त लागू करण्यात येतो.
( हेही वाचा – SRA Scheme : ठाण्यातील अधिकृत इमारतींनंतर आता एसआरए योजना क्लस्टर मुक्तीच्या दिशेने)
याबाबत जम्मू काश्मीरचे अतिरिक्त महानिदेशक मुकेश सिंह यांनी यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की, आजपासून सुरू झालेल्या बुद्ध अमरनाथ यात्रेतील यात्रेकरूंच्या संरक्षणाकरिता कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही यात्रा आजपासून 11 दिवस सुरू राहणार आहे. बुद्ध अमरनाथ यात्रा दरवर्षी हिंदू तिथीनुसार येणाऱ्या श्रावण महिन्यात आयोजित केली जाते. भक्त शिवाचे दर्शन घेऊन पूजा-अर्जा करतात. या आध्यात्मिक यात्रेसाठी स्थानिक जनतेनेही उत्साही आवाज उठवला आहे आणि यात्रेच्या मार्गावर पायाभूत सुविधा वाढवण्याच्या आवाहनालाही एकत्रितरित्या पाठिंबा दर्शवला आहे.
हेही पहा –