अजब ‘आजारा’वर गजब चर्चा; Buldhana येथे ३ दिवसातच पडतंय टक्कल!

159
केस गळती (Buldhana hair loss) किंवा टक्कल पडणे या समस्येमुळं महिला, तरुण असो की मध्यम वयाचे नागरिकही त्रस्त आहेत. बिघडलेली जीवनशैली (Lifestyle) आणि वाढते प्रदुषण या कारणांमुळं केस गळतीची समस्या हल्ली सगळ्यांमध्येच दिसत आहे. मात्र, राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात एक भलताच प्रकार समोर आला आहे. शेगाव  (Shegaon Taluka Baldness) तालुक्यात केस गळतीची साथ आलीये असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तालुक्यातील नागरिकांना अचानक टक्कल पडत असल्याने गावात भीतीचे वातावरण तयार झालं आहे. ही समस्या नेमकी कशाने उद्भवत आहे, ही बाब अद्याप अस्पष्ट आहे. (Buldhana)

तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावांतील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण (Infection with an unknown disease) होऊन चक्क तीन दिवसांतच संपूर्ण टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणी आरोग्य विभागाने गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केले आहे. ही समस्या नेमकी कशाने उद्भवत आहे, ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही.

सर्वेक्षणात आढळले ३० बाधित

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने (Department of Health) बोंडगावात सर्वेक्षण केले. त्यामध्ये केस गळतीच्या (Buldhana hair loss) आजाराने ३० जण बाधित असल्याची माहिती पुढे आली. त्यांच्याबाबत पुढील उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले. त्यांच्याकडून रुग्णांची लक्षण आणि उपचार सुरू करण्यात आले.

(हेही वाचा – CIDCO Lottery 2024: अखेर सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती जाहीर; अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख)

या कारणांमुळे आजाराची शक्यता

गावातील पाण्याचा स्त्रोत दूषित (Contaminated water) आहे का, तसेच पाण्याचा जडपणा मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. काही रुग्णांची त्वचारोग तज्ज्ञांकडे उपचार घेतले असता शॅम्पूमुळे असा प्रकार होऊ शकतो, अशी माहिती पीडितेना देण्यात आली.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.