- ऋजुता लुकतुके
ॲमेझॉनने भारतात आपली टेलिमेडिसिन सेवा ॲमेझॉन क्लिनिक सुरू केली आहे. यात ५० विविध आजार आणि रोगांवर उपचार मिळण्याची सोय आहे. अगदी २९९ रुपयांपासून ही सेवा उपलब्ध आहे. ॲमेझॉन ॲपवरुन तुम्ही या सेवेसाठी नोंदणी करू शकता. अँड्रॉईड आणि आयओएस प्रणालीवर ॲमेझॉन क्लिनिक सेवा सुरू करण्यात आली आहे आणि देशातील कुठल्याही कोपऱ्यात बसून देशभरातील डॉक्टरशी तुम्ही संपर्क साधू शकता. या यंत्रणेत रुग्णांचा डेटा गुप्त ठेवण्याची व्यवस्था आहे आणि एकदा केलेले रेकॉर्डही कायम ऑनलाईन साठवता येतात. भारतात सध्या टेलिमेडिसिन सेवेचा विस्तार होत आहे आणि त्यातच आता ॲमेझॉन क्लिनिक ही जागतिक कंपनी या व्यवसायात उतरली आहे. (Amazon Clinic)
(हेही वाचा – Imane Khelif : वैद्यकीय अहवाल फुटल्याप्रकरणी इमाने खलीफ करणार कायदेशीर कारवाई)
कोव्हिड १९ च्या काळात टेलिमेडिसिन व्यवसाय भारतात रुजला आणि या घडीला प्लम टेनिहेल्थ, फार्म इझी, टाटा १ एमजी आणि प्रॉक्टो टेक्नॉलॉजीज सारख्या कंपन्या आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये ही स्पर्धा वाढणार आहे. अशावेळी ॲमेझॉनच्या भारतातील प्रवेशामुळे भारतीय कंपन्यांचं नेमकं का होईल? ॲमेझॉन कंपनी देशातील स्पर्धा संपवून टाकतील का अशी भीतीही व्यक्त होतेय. पण, या क्षेत्रातील तज्ञांना सध्या ती भीती वाटत नाही. ‘भारत हा टेक क्षेत्रातील अग्रणी देश आहे आणि इथे टेलिमेडिसिन कंपन्यांच्या विकासाची भरपूर संधी आहे. (Amazon Clinic)
(हेही वाचा – Raigad जिल्ह्यात ७ पैकी ३ ठिकाणी मविआला शेकापचे आव्हान; महायुतीमध्ये आलबेल)
२०३२ पर्यंत ही बाजारपेठ १५.२ अब्ज अमेरिकन डॉलरची होणार आहे. अशावेळी सध्या स्पर्धेचेच दिवस आहेत आणि ही स्पर्धा निकोप व्हावी इतकीच इच्छा आहे,’ असं भार्गव वेलणकर हिंदुस्थान पोस्टशी बोलताना म्हणाले. स्पर्धा निकोप ठेवण्यासाठी मात्र सरकारने त्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. आणि त्यासाठीचे कायदे देशात आहेत की नाही आणि त्याची अंमलबजावणी होतेय की नाही हे पाहणं गरजेचं आहे. ती गरजही वेलणकर यांनी बोलून दाखवली. सध्या टेलिमेडिसिन कंपन्यांना आयटी कायद्याचं पालन गरजेचं आहे. कंपन्यांचं नियमित ऑडिट होणं आता गरजेचं आहे. (Amazon Clinic)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community