- ऋजुता लुकतुके
ॲमेझॉनवर आयफोन १५ (iPhone 15) वर सवलतींचा भडिमार होतोय. आणि कंपनीचा हा लेटेस्ट फोन तिथे ७५,००० रुपयांना उपलब्ध आहे. (iPhone 15 Price Cut)
ॲपल कंपनीचा नवीन आयफोन १५ (iPhone 15) लाँच होऊन काही महिनेच झाले आहेत आणि इतक्यातच कंपनीने फोनच्या किमतीत मोठी कपात केली आहे. म्हणजे प्रत्यक्ष किंमत जरी कमी झाली नसली तरी विविध ई-कॉमर्स वेबसाईटवर हा फोन सवलतीच्या दरात मिळत आहे. ॲमेझॉनवर तर लेटेस्ट फोन ७५,००० रुपयांपेक्षा कमी दरात मिळणार आहे. (iPhone 15 Price Cut)
१२ सप्टेंबरला कंपनीच्या वुंडरलस्ट कार्यक्रमात आयफोन १५ हा ७९,९९० रुपयांना लाँच झाला होता. पण, आता ॲमेझॉनवर तो ७४,९९० रुपयांना मिळत आहे. आणि यात ॲमेझॉन आयसीआयसीआय बँकेच्या कार्डावर मिळणारा ३,७४५ रुपयांचा कॅशबॅक पकडलात तर हा फोन तुम्हाला ७१,२४५ रुपयांना मिळेल. (iPhone 15 Price Cut)
Black iPhones >>> pic.twitter.com/EsUZnkchtl
— iPhone 15 Ultra (@iPhone15Ultra) September 6, 2023
(हेही वाचा – Ind vs Pak Davis Cup Tie : भारत पाकविरुद्धचा सामना सोडण्याची शक्यता )
आयफोन १५ (iPhone 15) मध्ये ॲपल कंपनीने नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरलं आहे. यातील डायनॅमिक आयलंड तंत्रज्ञान हे कंपनीच्या आधीच्या सर्व फोनपेक्षा वेगळं आहे. यामुळे फोन वापरण्याचा ग्राहकांचा अनुभवच बदलून जातो. या फोनचा डिस्प्ले ६.१ इंचांचा आहे. पण, फोनची प्रखरता २००० नीट्सने वाढवण्यात आली आहे. फोनचा प्राथमिक कॅमेरा ४८ मेगापिक्सेलचा आहे. यात फोन लवकरात लवकर ऑटोफोकस व्हावा यासाठी १०० पर्सेंट फोकस पिक्सेल वापरण्यात आले आहेत. (iPhone 15 Price Cut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community