Ambedkar Jayanti 2025 : डॉ. आंबेडकरांचे कार्य सामाजिक समरसतेचे; भाजपाच्या अर्चना वानखेडे यांचे प्रतिपादन

214

सनातन धर्म हा अनेक विचारवंताच्या विचाराच्या एकत्रीकरणाचा परिणाम आहे. (Ambedkar Jayanti 2025) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा द्वेष कधीच केला नाही, उलट जागतिक स्तरावर हिंदूधर्म सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगितले. परंतु काल परत्वे हिंदू धर्मात जे काही कालबाह्य चालीरीती वृत्ती, प्रथा, परंपरा, आचार पद्धती आणि दोष निर्माण झाले ते दूर करून हिंदू धर्माचे शुद्धीकरण करून वैज्ञानिक आधारावर हिंदू धर्म उभा करण्याचा त्यांनी अतोनात प्रयत्न केला. हिंदूंतील सर्व जातीतील स्त्री, पुरुष, युवा जे या दूषित विचार, वृत्ती आणि आचारांनी पिडीत होते, त्या सर्वांच्या प्रगती आणि विकासासाठी डॉ. आंबेडकरांचे कार्य असल्याने त्यांचे हे कार्य सामाजिक समरसतेचे निर्माण कार्यच होते, असे विचार भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा महामंत्री अर्चना वानखेडे यांनी व्यक्त केले. स्वा. सावरकर स्मारक स्मृति उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त स्वा. सावरकर (Veer Savarkar) सामाजिक सेवा समिती व संस्कार भारती वर्धा द्वारा आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या.

(हेही वाचा – काँग्रेस नेते Rashid Alvi यांच्याकडून मुर्शिदाबादमधील हिंसाचाराचे समर्थन; म्हणाले…)

यावेळी मंचावर सावरकर सेवा समितीचे उपाध्यक्ष प्रा. धनंजय देशपांडे व संस्कार भारती जिल्हा सहमंत्री केतकी कुलकर्णी होत्या. आरंभी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

पुढे बोलताना वानखेडे म्हणाल्या डॉ. बाबासाहेबांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) अथक प्रयत्नामुळे घटनेनुसार स्त्रिया आणि वंचित समाजाला ज्या सवलती प्राप्त झाल्या आहेत. त्याचा उपयोग राष्ट्र निर्माण कार्यासाठी, तसेच आपल्या समाजातील अविकसितांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी करणे आवश्यक आहे. कारण जागतिक स्तरावर वर्तमानात जी संघर्षाची स्थिती उत्पन्न होऊ पाहत आहे त्यासाठी समस्त भारतीय नागरिक राष्ट्र या एका विचाराने विकसित होऊन राष्ट्रसंरक्षणासाठी सिद्ध होणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच डॉ. आंबेडकरांनी  त्यांच्या वेगवेगळ्या वय स्थितीत काळाला अनुसरून विचार मांडले. त्यात भिन्नता दिसत असली तरी त्यातील उद्येश राष्ट्र हाच होता. त्या पुढे म्हणाल्या आंबेडकरांचे विचार हे आंबेडकर अनुयायान पुरते आणि रिपब्लिकन पक्षापुरते न राहता त्याला विस्तारित करण्याची वर्तमानात नितांत गरज आहे.

प्रास्ताविक सावरकर सेवा समितीचे अध्यक्ष श्याम देशपांडे यांनी केले त्यावेळी ते म्हणाले भारतरत्न घटनाशिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ संविधान आपल्यापर्यंत पोहोचू न देण्याचे पाप तत्कालीन शासनकर्त्यांनी करून ते थांबले नाहीत तर नंतरही दीर्घकाळ सत्तेवर राहणाऱ्यांनी त्यात मताच्या राजकारणासाठी अनेक सोयीचे बदल केले. त्यातीलच भाग म्हणजे कलम 370, 35 अ आणि वक्क बोर्ड जमीन प्रकरण, तसेच धर्मनिरपेक्षता आदीसारखा भाग होय. ज्याचे परिणाम आज आपण पाहतो आहोत. ते पुढे म्हणाले मूळ संविधान हेे खरोखरच राष्ट्राच्या संरक्षण, संवर्धन आणि संगोपन यासाठीच घटना शिल्पकारांनी विचारपूर्वक निर्माण केलेले होते. पण स्वार्थी राजकारण्यांनी त्यात सोईनुसार बदल केले.

कार्यक्रमाचे संचालन मकरंद उमाळकर यांनी तर आभार धनंजय देशपांडे यांनी मांनले. कार्यक्रमाला माधव पंडित, धर्मदास सोनटक्के, रमेश बढे, संजय हरदास, प्रमोद रंगारी, दीपक साने, देवाभाऊ कोरे, रवी सातदेवे, अनिल पाखोडे, कवि नेसन, नामदेव निमजे, मारोतराव हराळे, आशाताई घोडे, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. (Ambedkar Jayanti 2025)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.