नंदुरबारमध्ये धक्कादायक घटना; १३ गर्भवतींना घेऊन जाणारी रुग्णवाहिका उलटली

128
नंदुरबार या आदिवासी भागात धक्कादायक अपघात घडला. या रुग्णवाहिकेतून तब्बल 13  गरोदर महिला कोंबलेल्या होत्या, ही रुग्णवाहिका पुढे जात असताना अचानक उलटली, मात्र सुदैवाने या सर्व महिला थोडक्यात बचावल्या. हा अपघात होण्यामागे कोण दोषी होते, याची चौकशी सुरु झाली आहे.

गरोदर मातांना सोनोग्राफिसाठी आणले गेले होते

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा लोणखेडे जवळ गरोदर मातांना सोनोग्राफीसाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. शहादा येथील लोणखेडा अभियंत्रिकी महाविद्यालयासमोर गरोदर माता घेऊन जाणारी रुग्णवाहिका उलटली, त्यात 14 जण जखमी झाले, यात 13 गरोदर मातांचा समावेश होता. धडगाव अतिदुर्गम भागातील तेलखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून या गरोदर मातांना सोनोग्राफिसाठी आणले गेले होते. सोनोग्राफी झाल्यानंतर या महिला आपल्या गावाकडे परत घेऊन जाताना, रुग्णवाहिका अचानक उलटली. तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रतून 102 रुग्णवाहिकेने जात असताना भरधाव वेगात चालकाचे नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहिका उलटल्याने  हा अपघात झाला. 13 गरोदर महिला पुरूष चालक असे 14 जण अपघातात जखमी झाले आहेत. आमदार राजेश पाडवी यांच्या खासगी रुग्णवाहिकेतून जखमींना शहादा येथील नगर पालिकेच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व गरोदर मातांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून घटनास्थळी व रुग्णालयात नातेवाईकांनी धाव घेतली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.