अमेरिकेकडून जगाचा विश्वासघात; १५ लाख रेडिओ ऍक्टिव्हच्या पाण्याची गळती

सध्या जागतिक पर्यावरणाचा विषय भयंकर स्वरूप घेत आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्या राष्ट्रांना पर्यावरण वाचविण्याचे धडे देणाऱ्या अमेरिकेच्या अणुउर्जा प्रकल्पातून १५ लाख लीटर रेडिओअॅक्टिव्ह पाण्याची गळती झाली, तरी अमेरिकेने जगाला कळविले नाही. अमेरिकेच्या मध्य-पश्चिम मिनेसोटा राज्यातील मॉन्टीसेलो येथील अणुऊर्जा प्रकल्पातून सुमारे ४ लाख गॅलन (१५,१४,१६४ लीटर) किरणोत्सर्गी पाण्याची गळती झाली आहे. हे पाणी ट्रिटियमने दूषित झालेले आहे.

नियमित भूजल निरीक्षणादरम्यान पाण्यामध्ये रेडिओ एक्टिव्ह पदार्थ सापडले होते. नोव्हेंबर २०२२ अखेरीस हा प्रकार समोर आला होता. मिनेसोटा ड्युटी ऑफिसर आणि यूएस न्यूक्लियर रेग्युलेटरी कमिशनला याबाबत कळविण्यात आले होते. किरणोत्सर्गी पाण्याची गळती सार्वजनिक करण्यात चार महिन्यांच्या विलंबामुळे सार्वजनिक सुरक्षा आणि पारदर्शकतेबद्दल शंका निर्माण झाली आहे. दूषित पाणी मिसिसिपी नदी किंवा पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांपर्यंत पोहोचले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच गळती दुरुस्त करण्यात आल्याचेही प्रकल्प प्रमुखांनी म्हटले आहे. मॉन्टीसेलो प्लांटमधील दोन इमारतींमधील पाण्याच्या पाईपमधून गळती झाली होती, असे एक्सेल एनर्जीने म्हटले आहे.

(हेही वाचा दीपक केसरकरांची उद्धव ठाकरेंना ऑफर, म्हणाले… )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here