America Chabahar Port : भारताने इराणशी व्यापार वाढवल्यास त्याला निर्बंधांचा धोका; अमेरिकेचा थयथयाट

America Chabahar Port : अमेरिकेने इराणवर जवळपास सर्व व्यापारी निर्बंध लादले आहेत. त्यासह अमेरिकेच्या मित्र देशांनीही इराणला साहाय्य करणे आणि शस्त्रास्त्रे विकणे बंद केले आहे.

163
America Chabahar Port : भारताने इराणशी व्यापार वाढवल्यास त्याला निर्बंधांचा धोका; अमेरिकेचा थयथयाट
America Chabahar Port : भारताने इराणशी व्यापार वाढवल्यास त्याला निर्बंधांचा धोका; अमेरिकेचा थयथयाट

भारत (India) आणि इराण (Iran) यांच्यात झालेल्या ‘चाबहार बंदर करारा’वर (America Chabahar Port) अमेरिकेने आक्षेप घेतला आहे. इराणसमवेतच्या व्यापारामुळे भारताला निर्बंधांचा धोका असेल, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे उपप्रवक्ते वेदांत पेटल यांनी म्हटले. पटेल पुढे म्हणाले की, परराष्ट्र धोरणे आणि इतर देशांसमवेतच्या संबंधांसंदर्भात भारत त्याचा निर्णय घेऊ शकतो; परंतु इराण ज्या देशाशी व्यापार करत असेल, तो कुणीही असो, त्याच्यावर निर्बंध लावण्याचा धोका असेल.

अमेरिकेने इराणवर जवळपास सर्व व्यापारी निर्बंध लादले आहेत. त्यासह अमेरिकेच्या मित्र देशांनीही इराणला साहाय्य करणे आणि शस्त्रास्त्रे विकणे बंद केले आहे. इराणचा आण्विक कार्यक्रम, मानवाधिकारांचे उल्लंघन आणि आतंकवादी संघटनांना पाठिंबा यांमुळे अमेरिकेने हे निर्बंध लादले आहेत.

(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या सफाई कामगाराचा प्रामाणिकपणा, सापडलेले सोने केले पोलिसांच्या स्वाधीन)

भारत आणि इराण यांच्यातील चाबहार बंदर करार !

भारत आणि इराण यांनी वर्ष २०१८ मध्ये चाबहार बंदर बांधण्यासाठी करार केला होता. भारताला १३ मे या दिवशी इराणच्या चाबहार येथील ‘शाहिद बेहेश्ती बंदर’ १० वर्षांसाठी भाड्याने मिळण्याचा करार झाला आहे. या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल इराणला गेले होते. भारत आणि इराण दोन दशकांपासून या बंदरावर काम करीत आहेत. आता बंदराचे संपूर्ण व्यवस्थापन भारताकडे असेल.

कराराचा भारताला लाभ !

१. चाबहार बंदराच्या माध्यमातून भारत अफगाणिस्तान, तसेच मध्य आशियाई देश आणि रशिया यांच्यापर्यंत थेट पोचू शकेल.

२. याआधीपर्यंत भारत पाकच्या ग्वादर बंदरामार्गे (Gwadar Port) व्यापार करू शकत असे; परंतु पाकसमवेतचे संबंध संपुष्टात आल्यापासून भारत या क्षेत्रात पर्यायी मार्गाचा शोध घेत होता. आता भारताची चाबहार कराराद्वारे ही अडचण सुटणार आहे.

३. भारतीय आस्थापन ‘इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड’ (INDIA PORTS GLOBAL LIMITED) चाबहार बंदरावर १२ कोटी डॉलरची गुंतवणूक करणार असून त्याला २५ कोटी डॉलरचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. यामुळे अनुमाने ३७ कोटी डॉलरच्या मूल्याचा हा करार होईल.

४. भारत गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवण्यावर भर देत असून ‘चाबहार बंदर’ महत्त्वाची भूमिका बजावेल. या माध्यमातून भारत इराण, अफगाणिस्तान, आर्मेनिया, अझरबैजान, रशिया, मध्य आशिया आणि युरोप यांच्याशी थेट व्यापार करू शकणार आहे.

५. या देशांचा नैसर्गिक वायू आणि तेलही या बंदरातून भारताला यापुढे आयात करता येईल.

६. भूराजकीयदृष्ट्याही या बंदराचा विकास झाल्यामुळे भारत अरबी समुद्रात चीनच्या हालचालींकडे लक्ष ठेवू शकेल. तसेच चीन पाकिस्तानातील ग्वादर बंदराला विकसित करण्यासाठी प्रयत्नरत आहे. भारताची चाबहार बंदरावरील उपस्थिती त्याला ग्वादर बंदरावरील चीन आणि पाक यांच्या हालचाली समजण्यासाठी साहाय्यभूत ठरणार आहे. दोन्ही बंदरांमधील अंतर अवघे ७० किमी आहे.

७. चाबहारचा वापर गेल्या वर्षी भारताने अफगाणिस्तानला २० सहस्र टन गहू साहाय्य म्हणून पाठवण्यासाठी केला होता. वर्ष २०२१ मध्ये इराणला पर्यावरणास अनुकूल कीटकनाशकांचा पुरवठा करण्यासाठीही त्याचा वापर करण्यात आला. (America Chabahar Port)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.