अमेरिकेसाठी धोक्याची घंटा; तुर्कस्तानसारखी होऊ शकते परिस्थिती 

106

सध्या जगभरातील टेक्टॉनिक प्लेट्समध्ये बदल होताना दिसत आहे. त्यामुळे जगभरात तीव्र भूकंपाचे धक्के बसू लागले आहेत. नुकतेच तुर्कस्थानमध्ये मोठा भूकंप झाला, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली. याची पुनरावृत्ती अमेरिकेत होण्याची शक्यता वैज्ञानिक व्यक्त करत आहेत.

काय आहे नेमके कारण? 

पॅसिफिक महासागराच्या तळाशी ९६५ किमी लांबीच्या फॉल्ट लाइनमध्ये एक छिद्र आढळले आहे. परिणामी अमेरिकेच्या किनारपट्टीवर ९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो, असे मत वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे. ‘पायथियास ओएसिस’ नावाच्या छिद्रातून ४ किमी खाली अडकलेला द्रव समुद्रात सोडला जात आहे. हा द्रव पदार्थ टेक्टोनिक प्लेट्समध्ये लुब्रिकंट म्हणून काम करतो. हे छित्र विनाशकारी भूकंपाची सुरुवात करू शकते, अशी भिती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या तीव्र भूकंपामुळे अमेरिकेच्या वायव्येकडील शहरे नष्ट होतील. उष्ण द्रव पदार्ध बाहेर पडत असलेले छिद्र ओरेगॉनच्या किनार्‍यापासून ५० मैल अंतरावर आहे, जे कॅस्केडिया सबडक्शन झोन म्हणून ओळखले जाते. या छित्रामुळे तब्बल ९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो, अशी भिती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. या छिद्रातून द्रव पदार्थ बाहेर पडण्याचे दृष्य सर्वात आधी २०१५ मध्ये पाहायला मिळाले होते. या द्रव पदार्थामुळे प्लेट्सला सहज हलवता येते, परंतु याशिवाय “दाब निर्माण होऊन विनाशकारी भूकंप होऊ शकतो.” हे छिद्र कॅस्केडिया सबडक्शन झोनच्या सीमेवर आहे आणि रासायनिकदृष्ट्या वेगळे द्रव सोडते.

(हेही वाचा पुलवामा हल्ल्याप्रकरणी जम्मू-काश्मीरच्या माजी राज्यपालांचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.