खलिस्तानी दहशतवादी Gurpatwant Singh Pannun च्या बँक खात्याची माहिती भारताला देण्यास अमेरिकेचा नकार

128
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या बँक खात्याची माहिती भारताला देण्यास अमेरिकेचा नकार
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या बँक खात्याची माहिती भारताला देण्यास अमेरिकेचा नकार

‘सिख फॉर जस्टिस’ (Sikhs for Justice) या खलिस्तानी आतंकवादी (Khalistani terrorists) संघटनोचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू (Gurpatwant Singh Pannun) याच्या बँक खात्यांची माहिती देण्यात अमेरिकेने नकार दिला आहे. पन्नू याच्याकडे अमेरिका आणि कॅनडा या देशांचे नागरिकत्व आहे. सध्या तो अमेरिकेत रहात आहे. भारताने पन्नू आणि त्याच्या संघटनेला आतंकवादी घोषित केले आहे. अनेक प्रकरणात तो भारताला हवा आहे. या अनुषंगाने भारताने अमेरिकेकडे पन्नूला कह्यात देण्याची मागणी केली होती; मात्र अमेरिकेने ती नाकारली, तसेच त्याच्या बँक खात्यांची माहिती देण्याची मागणीही नाकारली आहे. यासाठी अमेरिकेतील स्थानिक कायद्यांचे कारण पुढे केले आहे.

(हेही वाचा – Tamil Nadu hospital Fire : तामिळनाडूमध्ये रुग्णालयाला भीषण आग; अल्पवयीन मुलासह ७ जणांचा मृत्यू, Video व्हायरल)

१४ ऑगस्ट २०२० या दिवशी पंजाबच्या मोगा जिल्हाधिकारी कार्यालयावर कथित खलिस्तानी झेंडा फडकवण्यात आला होता. गुरुपतवंत सिंह पन्नू याने त्या वेळी अशा प्रकारे खलिस्तानी झेंडा फडकावणार्‍याला अडीच सहस्र डॉलर देणार असे घोषित केले होते. त्याला भुलून २ व्यक्तींनी हा गुन्हा केल्याची माहिती पंजाब पोलिसांकडून देण्यात आली.

या प्रकरणात भारताच्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अमेरिकेकडे पन्नूचे बँक खाते आणि त्याचा भ्रमणभाष क्रमांक यांची माहिती मागितली होती. ‘या गुन्ह्यासाठी अमेरिकी कायद्यात एका वर्षाहून कमी शिक्षा आहे. त्यामुळे त्याची माहिती आम्ही देऊ शकत नाही’, अशी भूमिका अमेरिकी प्रशासनाने घेतली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.