- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई सागरी किनारा मार्ग अर्थात कोस्टल रोडवर (Coastal Road) उभारण्यात येणाऱ्या तीन वाहनतळाऐवजी अमरसन्स येथील वाहनतळाचे काम महापालिकेने आता गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत अमरसन्स येथे सुमारे २५० वाहन क्षमता असणरे वाहनतळ उभारण्याचे काम सुर झाले असून याचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक रहिवाशांना विरोधामुळे या वाहनतळाचे बांधकाम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाहनतळाचे बांधकाम करणाऱ्या एल अँड टी कंपनीला हे काम सुस्थितीत आणून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे या वाहनतळासाठी केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
(हेही वाचा – शक्तिपीठ महामार्गाला CM Devendra Fadnavis यांचा हिरवा कंदील; महामार्गाचे काम सुरु करण्याचे निर्देश)
मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड (Coastal Road) प्रकल्पांतर्गत हाजी अली येथील रजनी पटेल चौक येथे दुमजी वाहनतळ, वरळी आणि अमरसन्स या दोन अन्य जागीही वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या प्रकल्पांतर्गत तीन ठिकाणी वाहनतळ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. यातील हाजी अली येथील वाहनतळाचे काम पूर्ण झाले याठिकाणी दोन ऐवजी चार मजली भूमिगत वाहनतळामध्ये १२३५ वाहनांच्या क्षमतेनुसार बांधकाम केले जाणार आहे.
(हेही वाचा – Delhi Assembly Election : मुस्लिम मतांवर राजकीय पक्षांचा डोळा)
मात्र, त्याबरोबरच अमरसन्स येथे सुमारे २५० वाहनांच्या क्षमतेनुसार हाती घेण्यात आलेल्या वाहनतळाचे काम सुरु झाल्यानंतर बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेचे अतिरिक्त अमित सैनी यांनी अमरसन्स येथील वाहनतळाच्या बांधकाम एल अँड टी कंपनीच्या माध्यमातून सुरु होते, त्यानुसार वाहनतळाच्या बांधकामासाठी खोदकामही झाले होते. परंतु स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यामुळे येथील वाहनतळाचे बांधकाम थांबवण्याच्या सूचना करून हा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी जे खोदकाम झाले आहे, ते पूर्वस्थितीत आणून ठेवण्याच्या सूचना संबंधित कंपनीला देण्यात आले असून याठिकाणी अग्निशमन दलाचे केंद्र किंवा अन्य काही सुविधा केंद्र बांधता येईल याचा अभ्यास केला जाईल. मात्र, यासाठी जो खर्च झाला आहे, तो संबंधित कंत्राटदाराला देयात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत आता हाजी अली आणि वरळी येथेच वाहनतळाचे बांधकाम केले जाणार आहे. (Coastal Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community