Amethi मध्ये सापडले १२० वर्ष जुने मंदिर; हिंदूंना पूजा-अर्चना करण्यास धर्मांधांची बंदी

60
Amethi मध्ये सापडले १२० वर्ष जुने मंदिर; हिंदूंना पूजा-अर्चना करण्यास धर्मांधांची बंदी
Amethi मध्ये सापडले १२० वर्ष जुने मंदिर; हिंदूंना पूजा-अर्चना करण्यास धर्मांधांची बंदी

उत्तर प्रदेशमधील संभल, वाराणसी, अलिगढ आणि बुलंदशहरानंतर अमेठी (Amethi) येथे एक शिवमंदिर (Shiv Mandir) सापडले आहे. मुसाफीरखाना पोलिस ठाण्याच्या (Musafirkhana Police Station) हद्दीत औरंगाबाद गावात हे मंदिर आहे. स्थानिक रहिवाशांच्या म्हण्यानुसार, हे मंदिर १२० वर्ष जुने आहे. या मंदिरावर मुस्लिमांनानी बेकायदेशीर कब्जा केला असून, गेली २० वर्ष तिथे पूजा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दि. २३ डिसेंबर रोजी भाजपा (BJP) जिल्हा सरचिटणीस अतुल सिंह (Atul Singh) यांनी एसडीएमकडे कारवाई करण्यासाठी तक्रारपत्र दिले आहे. (Amethi)

( हेही वाचा : BMC : महापालिकेचे सहआयुक्त चंद्रशेखर चौरे आणि उपायुक्त चव्हाण सेवानिवृत्तीनंतर बनणार विशेष कार्य अधिकारी

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मंदिराची स्थापना १२० वर्षांपूर्वी एका मागासवर्गीय कुटुंबाने केली. त्यानंतर हे मंदिर त्या परिसरातील लोकांचे श्रद्धास्थान बनले आहे. पंरतु गेल्या काही वर्षांपासून या मंदिरात हिंदूंना (Hindu) पूजा-अर्चना करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे अनेक लोक नाराजी व्यक्त करीत आहेत. यासंबंधी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अतुल सिंह (Atul Singh) यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी एसडीएम प्रिती तिवारी (Preeti Tiwari) यांना तक्रारपत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. या तक्रार पत्राची दखल घेतल्यावर या प्रकरणाचा तपास तहसीलदारांकडे सोपवण्यात आला आहे. तपास अहवाल समोर आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे एसडीएम प्रिती तिवारी यांनी सांगितले आहे.(Amethi)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.