ऐन तारुण्यातील काही वर्षे अग्निवीर म्हणून द्यायची, त्यानंतर पुन्हा घरी परतायचे, अशा वेळी या मुलांचे पुढचे भविष्य काय, असा मुद्दा उपस्थित करून विरोधकांनी या योजनेतील त्रुटींवर बोट ठेवून केंद्र सरकारला लक्ष्य करत आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विरोधकांचा हा मुद्दाच मोडीत काढला. हरियाणाच्या निवडणूक प्रचाराच्या भाषणात त्यांनी मोठी घोषणा केली.
(हेही वाचा श्री गणरायाला निरोप देताना DCM Devendra Fadanvis यांनी बाप्पाकडे मागितले अनोखे मागणे; म्हणाले…)
भिवानी येथे एक प्रचारसभेला संबोधित करताना अग्निवीर योजनेसंदर्भात एक मोठी घोषणा अमित शाह यांनी केली. राहुल गांधी आणि हुड्डा कुटुंब अग्निवीर योजनेसंदर्भात देशातील जवानांना संभ्रमित करत आहे, असे सांगत मी हरियाणातील सर्व अग्निवीरांना गॅरंटी देतो की, ते जेव्हा सैन्यातून परततील, तेव्हा आम्ही त्यांना नोकऱ्या देऊ, अशी घोषणा अमित शाह यांनी केली. अमित शाह म्हणाले, काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा एकच अजेंडा आहे आणि तो म्हणजे, पाकिस्तान सोबत चर्चा करणे आणि दहशतवाद्यांना सोडून देणे. पुन्हा एकदा 370 परत आणण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र ते असे कधीही करू शकणार नाहीत. पाकव्याप्त काश्मीर आपला आहे आणि भारताचा अविभाज्य भाग आहे, असेही अमित शाह (Amit Shah) म्हणाले.
Join Our WhatsApp Community