वक्फ (सुधारणा) विधेयकाला (Waqf Amendment Bill) लोकसभेत दि. २ एप्रिल रोजी उशीरा मंजुरी मिळाली. विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ खासदारांनी मतदान केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी वक्फ बोर्डाने (Waqf Board) कशाप्रकारे जमिती हस्तगत केल्या आणि चुकीचा वापर केला, याची माहिती दिली आहे. भारतात १२ व्या शतकात वक्फची सुरुवात झाली. सुरुवातीला दोन गावे वक्फला देण्यात आली. त्यानंतर आता वक्फकडे ३९ लाख एकरची जमीन असून १२ वर्षात वक्फकडील जमीन दुपटीने वाढली आहे. (Amit Shah)
( हेही वाचा : खासदार A. Raja यांचे हिंदूंविरोधात वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, द्रमुक पक्षात आल्यावर हिंदू प्रतिकांना…)
अमित शाह (Amit Shah) म्हणाले की, “वक्फकडे एकूण ३९ लाख एकर जमीन आहे, त्यातील २१ लाख एकर जमीन मागच्या १२ वर्षांत हस्तगत केली आहे आणि विरोधक म्हणत आहेत की, वक्फचा काहीच दुरुपयोग झालेला नाही.” तसेच वक्फ मालमत्तेच्या (Waqf property) चांगल्या व्यवस्थापनासाठी १९९५ च्या वक्फ कायद्यात सुधारणा (Waqf Amendment Bill) करण्यात आल्याचा उल्लेख शाह (Amit Shah) यांनी केला. मागच्या वर्षी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत ९.४ लाख एकर क्षेत्रफळावरील ८.७२ लाख एकर मालमत्तेचा समावेश होता. भारतात सध्या एक केंद्रीय आणि ३० राज्यात राज्यपातळीवरील वक्फ बोर्ड (Waqf Board) आहेत. (Waqf Amendment Bill)
दरम्यान वक्फ बोर्डाकडून जमीने व्यवस्थापन करण्यात पारदर्शकता नसल्यामुळे त्याचा गैरवापर होत आहे. वक्फ बोर्डाने भाडपेट्ट्यावर २०,००० मालमत्ता दिल्या होत्या. पण २०२५ मध्ये या मालमत्तांची संख्या शून्य आहे. मग या मालमत्ता कुठे गेल्या? असा सवालही अमित शाह (Amit Shah) यांनी उपस्थित केला.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community