छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर (Raigad Fort) येत्या १२ एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कार्यक्रमाला येणार असल्याने रायगडाचा आढावा घेतला जात आहे. (Amit Shah)
( हेही वाचा : Weather Update : उन्हाचा चटका वाढणार; ‘या’ राज्यांमधील उष्णतेची लाट तीव्र होणार)
दररोज शेकडो शिवभक्त, पर्यटक भेट देत असतात. या ऐतिहासिक स्थळी शिवराज्यभिषेक सोहळा, शिवपुण्यतिथी आदी मोठे कार्यक्रम होतात. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची १२ एप्रिल रोजी ३६५ वी पुण्यतिथी आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे गडावरील सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोरपणे पालन करणे प्रशासन, शासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे कार्यक्रमस्थळी बंद पडलेले सीसीटीव्ही बदलण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. (Amit Shah)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथी निमित्ताने किल्ले रायगड येथे चैत्र पौर्णिमा, शालिवाहन शके १९४७, शुक्रवार ११ व. शनिवार १२ एप्रिल रोजी राजसभेमध्ये सकाळी ११ वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, स्थानिक उत्सव समिती महाड यांच्याकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर शुक्रवारी, दि. ११ एप्रिल रोजी सात वाजता शिवसमाधी आणि जगदीश्वर मंदिर येथे दीप वंदनाचा कार्यक्रम आहे, तर रात्री ८. ३० पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या मुलाखती (राजसभेत) होतील. तर रात्री ९. ३० वाजता ही रात्र शाहिरांची शाहीर सुरेश सूर्यवंशी पुणे यांचा कार्यक्रम आहे तर रात्री १०. ०० वाजता हरी जागर श्री जगदीश्वर प्रांगणात होईल. (Amit Shah)
किल्ले रायगडावर शनिवार १२ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता. श्री जगदीश्वराची पूजा व सकाळी ६ वाजता हनुमान जयंती उत्सव तर सकाळी ८ वाजता श्री शिवसमाधी येथे महापूजा तसेच सकाळी ११ वाजता. राज दरबारात श्री शिवप्रतिमा प्रतिमा पूजन होईल या कार्यक्रमास सैन्यदल अधिकारी आणि सरदार घराणे सन्मान गडा रोहन स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा ‘श्री शिव पुण्य स्मृती रायगड पुरस्कार’. वितरण ‘शिवराय मुद्रा’ स्मरणिका प्रकाशन. प्रमुख पाहुणे यांचे मनोगत सकाळी १२.४५ वाजता. श्री शिवप्रतिमा पालखी मिरवणूक समाधी (राज दरबार ते शिवसमाधी), दुपारी १.००वाजता. श्री शिवछत्रपतींना मानवंदना (सर्व शिवभक्त व रायगड जिल्हा पोलीस), दुपारी १.३० वाजता महाप्रसाद वितरण (होळीचा माळ) अशा दोन दिवसाचा कार्यक्रम किल्ले रायगड येथे पार पडणार आहे. (Amit Shah)
किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथी निमित्ताने, किल्ले रायगड येथे चैत्र पौर्णिमा ,शालीवाहन शके १९४७, शनिवार १२ एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून विशेष उपस्थिती म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar), चंद्रकांत दादा पाटील, आदिती तटकरे, भरत गोगावले, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) हे उपस्थित राहणार आहेत. (Amit Shah)
लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील दत्तात्रय तटकरे, राज्यसभेचे खासदार धैर्यशील दादा पाटील, पेणचे आमदार रवी शेठ पाटील , अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, उरणचे आमदार महेश बालदी, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह विशेष सत्कारमूर्ती श्री शिव पुण्यस्मृती रायगड पुरस्कार दुर्गा अभ्यासक निळकंठ रामदास पाटील, सैन्यदल अधिकारी लेफ्टन जनरल संजय कुलकर्णी, सरदार घराण्याचे सन्माननीय व्यक्ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज उदयसिंह होळकर असे मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. (Amit Shah)
किल्ले रायगडावर शिवपुण्यतिथीनिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह राज्याचे अनेक मंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याने अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्रीय व राज्य सुरक्षा यंत्रणेने महाड पासून किल्ले रायगड कडे जाणाऱ्या मार्गापासून ते किल्ले रायगडावर पायऱ्यां मार्गे व रोपवेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा तैनात करण्याचे काम चालू केले आहे. या सुरक्षा यंत्रणेमुळे किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्त व पर्यटकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेमुळे पर्यटक व शिवभक्तांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. (Amit Shah)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community