अमरावती येथे प्रभात टॉकीज येथे दोन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. यामध्ये काही जण जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. काही वेळाने या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
काही क्षणात इमारत जमीनदोस्त
रविवार, ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेतीन वाजताच्या सुमारास अचानकपणे इमारतीचा काही भाग कोसळू लागला, त्यानंतर काहीच वेळात संपूर्ण इमारत खाली कोसळली. ही इमारत कोसळल्यावर बचाव कार्य सुरु झाले, त्यात काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बचाव कार्यात स्थानिकांनी सहभाग घेतला. या घटनेची माहिती मिळताच पालिका प्रशासन आणि पोलिस, अग्निशमन दलाचे बंब आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. काही वेळाने काही प्रमाणात ढिगारा बाजूला केला असता त्यात ५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही दुर्घटना इतकी गंभीर होती की, काही समजण्याच्या आताच संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली. ही इमारत जुनी झाली होती. प्रशासनाने बचाव कार्य सुरु केले आहे. बचाव कार्य करणाऱ्यांनी ५ जणांचा मृतदेह बाहेर काढला आहे. या दुर्घटनेत आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. राजदीप बॅग हाऊस असे या कोसळलेल्या इमारतीचे नाव आहे. या इमारत दुर्घटनेबाबत माहिती देताना जितेंद्र सिंग हे दुकानदार आणि स्थानिक रहिवाशी म्हणाले की, आज कोसळलेली ही इमारत ८० वर्षे जुनी आहे. या इमारतीतील सर्व रहिवाशांना सर्वांनी समजावले की इमारत रिकामी करा, या इमारतीपासून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला धोका आहे. ती फार जुनी झालेली आहे. कधीही कोसळू शकते. मात्र लोकांनी ऐकले नाही. त्यांच्यात परस्परात वाद आहेत. त्यामुळे दुर्घटना घडल्याचे पाहायला मिळाले आहे.
Join Our WhatsApp Community