अमरावतीतील (Amravati) मेळघाट हा अतिदुर्गम भाग आहे. घाटातील वळणाच्या मार्गावर अपघात (Bus Accident) झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मेळघाट मधील वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखाली बस कोसळली आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा धारणी मार्गावर सेमाडोह जवळ हा अपघात घडला आहे. सर्व जखमी प्रवाशांवर सेमोडो प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या अपघातात 50 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
(हेही वाचा-Western Railway: प्रवाशांनो कृपया इकडे लक्ष द्या! पश्चिम रेल्वेवर साडेसहा तासांचा ब्लॉक, ‘या’ लोकल रद्द)
पुलावरुन वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस खाली कोसळली (Bus Accident) . अपघात इतका भीषण होता की, पुलाचा कठडा तोडून बस थेट दरीत कोसळली. काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रवाशांना बसच्या खिडकीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसंच. दरीत पाणी असल्याने बचावकार्य करण्यासही अडथळा येत आहे.
(हेही वाचा-Assembly Elections : मुख्यमंत्री पदाभोवती राज्याचे राजकारण)
अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक व प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. स्थानिक रहिवाशांना जखमींना मदत करत उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. तसंच, पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत अपघाताची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. अपघातस्थळी पोलिस अधिकारी व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित आहेत. (Bus Accident)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community