Amravati News : अमरावतीत १९ दिवसांत ४१ डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण

29
Amravati News : अमरावतीत १९ दिवसांत ४१ डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण
Amravati News : अमरावतीत १९ दिवसांत ४१ डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण

अमरावती शहरात सप्टेंबर महिन्याच्या १९ दिवसांत ८७ संशयितांपैकी ४१ डेंग्यू पॉझिटिव्ह (Dengue positive) रुग्ण आढळले आहेत. मागील ८ महिने १९ दिवसांचा विचार करता शहरात १३८ पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. स्वच्छतेवर ४० कोटी रुपये मनपाद्वारे खर्च केले जात असताना अशी स्थिती असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : दहशतवाद्यांच्या गळ्यात गळे घालणारे खरे देशद्रोही, मुख्यमंत्र्यांची काँग्रेसवर टीका)

धुवारणी, फवारणीत अनियमितता तसेच नियमितपणे स्वच्छताही होत नसल्याने स्वच्छता व आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडले पडले आहे. शहरात आरोग्य विभागाद्वारे नागरिकांना कोरडा दिवस पाळण्यासह पाण्याची भांडी, फुलदाण्या, कुलरचे टब, छतावर पडलेले भांडे रिकामे करण्याचा तसेच पाण्याचे टाके स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु, सातत्याने ही कामे करत असतानाही शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाळ्यानंतर अशाप्रकारे साथरोगांसह डेंग्यूची लागण होत असते, असे आरोग्य विभागाचे मत आहे. जिल्ह्याचा विचार करता मागील ८ महिने १९ दिवसांत जिल्ह्यात १७०० संशयितांपैकी २८० डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातच डेंग्यूच्या लाटेला आवर घालण्यासाठी आणखी परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. कारण, सध्या जनजागृतीसह उपाययोजना सुरू आहेत. यात ताप आलेल्यांच्या घरी आरोग्य पथकांच्या भेटी, रक्तजल नमुने गोळा करणे, पाण्यात गप्पी मासे सोडणे, पाण्याची भांडी रिकामी करणे, शक्य असेल तेथे पाण्यावर फवारणी करणे अशा उपाययोजना आरोग्य विभागाद्वारे केल्या जात आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.