मान्यताप्राप्त पाच गर्भपात केंद्रांमध्ये आढळला धक्कादायक प्रकार!

119

वर्धा जिल्हा शल्य चिकित्सकांनी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची तपासणी करण्यासाठी दोन डॉक्टर व एका विधी सल्लागारांची अशी तीन सदस्यीय समिती नेमली. या समितीने जिल्हाभरात आतापर्यंत १६७ सोनोग्राफी व १३५ गर्भपात केंद्रांची आकस्मिक तपासणी केली. या दरम्यान समितीने एक सोनोग्राफी केंद्र सील केले असून ग्रामीण भागातील पाच मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रांमध्ये मुदतबाह्य औषधांचा साठा सापडला आहे.

एकूण १३५ मान्यताप्राप्त गर्भपात केंद्र

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील एका रुग्णालयात अवैध गर्भपाताचे प्रकरण समोर आल्यामुळे राज्यशासनाने जिल्हा शल्यचिकीत्सकांना आपापल्या जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्र व मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रांची तपासणी करण्याबाबत आदेश दिले होते. त्यामुळेच जिल्हा शल्य चिकित्सकांनी नेमलेल्या त्रिसदस्यीय पथकाने मागील तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात तपासणी मोहीम सुरू केली आहे. समिती सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ग्रामीण भागात ६१, तर मनपा हद्दीत १३० मान्यताप्राप्त सोनोग्राफी केंद्र, तर ग्रामीण भागात ५२ आणि मनपा हद्दीत ८३ असे एकूण १३५ मान्यताप्राप्त गर्भपात केंद्र आहेत. यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सकांनी ग्रामीण भागात तर मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनी शहर परिसरात तपासणीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती कोणत्याही सोनोग्राफी केंद्रांच्या तपासणीसाठी गेल्यानंतर महत्त्वाच्या चार ते पाच मुद्द्यांची पाहणी करते. यामध्ये सोनोग्राफीसाठी जिल्ह्यात पाच गर्भपात केंद्रांमध्ये आढळला मुदतबाह्य औषधांचा साठा येणाऱ्या रुग्णांच्या नावांची नोंद घेतली जाते किंवा नाही, ऑनलाइन माध्यमाने ‘एफ’ फॉर्म भरल्या जातात किंवा नाही, मशिनचा क्रमांक (एमआरसी प्रमाणपत्र), ‘या ठिकाणी गर्भलिंगनिदान केले जात नाही’ असे फलक लावलेले आहे किंवा नाही.

(हेही वाचा आदित्य ठाकरेंमुळे राज्यातील पर्यटनक्षेत्र बहरले!)

५ केंद्रांवर मुदतबाह्य औषधांचा साठा समितीला आढळून

आतापर्यंत तपासणी समितीने ग्रामीण भागातील ६१ पैकी ५७ सोनोग्राफी, तर ५२ मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रांची तसेच मनपा हद्दीतील १३० पैकी ११० सोनोग्राफी आणि ८३ गर्भपात केंद्रांपैकी ७७ केंद्रांची तपासणी केली. ग्रामीण भागात ५२ मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रांची तपासणी करत असताना ५ केंद्रांवर मुदतबाह्य औषधांचा साठा समितीला आढळून आला आहे. हे सर्व केंद्र खासगी असून समितीने संबधित केंद्र संचालकांना खुलासे सादर करण्याबाबत नोटीस बजावली आहे, अशी माहिती अॅड. प्रणिता भाकरे (रानोटकर) यांनी दिली आहे. या समितीमध्ये अॅड. भाकरे यांच्यासह आरएमओ डॉ. प्रशांत गोडाम आणि डॉ. श्रीराम सापट यांचा समावेश आहे.

एक वर्ष आणि सहा महिन्यांपूर्वीचा मुदत संपलेला साठा

जिल्हयाच्या ग्रामीण भागातील पाच मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रांमध्ये मुदतबाह्य औषधांचा साठा सापडला. या पाच पैकी काही केंद्रावर, तर एक वर्षांपूर्वी तर काही केंद्रांमध्ये ६ महिन्यांपूर्वी मुदत संपलेल्या औषधांचा साठा सापडला आहे. या औषधांमध्ये गर्भपाताच्या गोळ्यांसह गर्भपात करण्यासाठी आवश्यक ‘ऑपरेशन थेअटर’मधील इतर औषधांचा समावेश आहे. यामध्ये काही ठिकाणी एक दोन स्ट्रिप्स मिळाल्यात तर एका ठिकाणाहून अर्धी पिशवी भरुन साठा असल्याचे अॅड. प्रणिता भाकरे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.