भारतीय रेल्वेसाठी ‘अमृत भारत स्थानक’ योजना, काय आहेत उद्दिष्टे?

573

रेल्वे मंत्रालयाने स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी “अमृत भारत स्थानक” योजना या शीर्षकाखाली नवीन धोरण तयार केले आहे. अमृत भारत स्थानक योजनेमार्फत रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे.

( हेही वाचा : टीम इंडियाला मिळणार नवा यष्टीरक्षक? श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून ऋषभ पंतचे नाव वगळले…)

अमृत भारत स्थानक योजनेची व्यापक उद्दिष्टे :

  1. रेल्वे स्थानकांचा बृहत आराखडा तयार करणे आणि त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करणे. स्थानकावर रूफ प्लाझा आणि सीटी सेंटर निर्माण करणे.
  2. निधीची उपलब्धता आणि परस्पर प्राधान्य यावर आधारित रेल्वे स्थानकाच्या वापराचा अभ्यास करणे.
  3. रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवाशांसाठी जागा सोडण्यात येईल आणि रेल्वे कार्यालये योग्य ठिकाणी स्थलांतरित केली जातील.
  4. एक स्थानक एक उत्पादनासाठी किमान दोन स्टॉल्सची तरतूद केली जाईल.
  5. एक्झिक्युटिव्ह लाउंज आणि छोट्या व्यावसायिक बैठकांसाठी देखील जागा उपलब्ध केली जाईल.
  6. सर्व श्रेणीच्या स्थानकांवर उच्च स्तरीय प्लॅटफॉर्म (760-840 मिमी) तयार केले जातील. प्लॅटफॉर्मची लांबी साधारणपणे 600 मीटर असावी.
  7. प्लॅटफॉर्म छताची लांबी, स्थान आणि टप्पा स्थानकाच्या वापराच्या आधारे ठरवले जातील.
  8. स्थानकांवरील दिव्यांगजनांसाठीच्या सुविधा रेल्वे बोर्डाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असतील.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.