रेल्वे मंत्रालयाने स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी “अमृत भारत स्थानक” योजना या शीर्षकाखाली नवीन धोरण तयार केले आहे. अमृत भारत स्थानक योजनेमार्फत रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे.
( हेही वाचा : टीम इंडियाला मिळणार नवा यष्टीरक्षक? श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून ऋषभ पंतचे नाव वगळले…)
अमृत भारत स्थानक योजनेची व्यापक उद्दिष्टे :
- रेल्वे स्थानकांचा बृहत आराखडा तयार करणे आणि त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करणे. स्थानकावर रूफ प्लाझा आणि सीटी सेंटर निर्माण करणे.
- निधीची उपलब्धता आणि परस्पर प्राधान्य यावर आधारित रेल्वे स्थानकाच्या वापराचा अभ्यास करणे.
- रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवाशांसाठी जागा सोडण्यात येईल आणि रेल्वे कार्यालये योग्य ठिकाणी स्थलांतरित केली जातील.
- एक स्थानक एक उत्पादनासाठी किमान दोन स्टॉल्सची तरतूद केली जाईल.
- एक्झिक्युटिव्ह लाउंज आणि छोट्या व्यावसायिक बैठकांसाठी देखील जागा उपलब्ध केली जाईल.
- सर्व श्रेणीच्या स्थानकांवर उच्च स्तरीय प्लॅटफॉर्म (760-840 मिमी) तयार केले जातील. प्लॅटफॉर्मची लांबी साधारणपणे 600 मीटर असावी.
- प्लॅटफॉर्म छताची लांबी, स्थान आणि टप्पा स्थानकाच्या वापराच्या आधारे ठरवले जातील.
- स्थानकांवरील दिव्यांगजनांसाठीच्या सुविधा रेल्वे बोर्डाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असतील.