मध्य रेल्वेच्या १५ उपनगरिय स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत स्थानक या योजनेअंतर्गत मध्य रेल्वेच्या स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. यामुळे स्थानकांवर विविध सुविधा तसेच उपाययोजना करण्यात येणार आहेत.
( हेही वाचा : ऋषभ पंतबाबत मोठी अपडेट; शस्त्रक्रियेकरता मुंबईत आणणार, BCCI ची माहिती )
या १५ स्थानकांचा विकास होणार…
रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत मध्य रेल्वेवरील १५ स्थानाकांचा विकास करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या यादीत खालील १५ स्थानकांचा समावेश आहे…
- भायखळा
- चिंचपोकळी
- परळ
- माटुंगा
- कुर्ला
- विद्याविहार
- विक्रोळी
- कांजूरमार्ग रोड
- मुंब्रा
- दिवा
- टिटवाळा
- शहाड
- इगतपुरी
- वडाळा
या १५ स्थानकांमध्ये रुफ प्लाझा, स्थानक प्रवेशद्वाराची लांबी-रुंदी वाढवणे, स्थानकाच्या दर्शनी भागाची सुधारणा, वर्दळीच्या परिसरात सुधारणा, फलाटावरील छतामध्ये सुधारणा, नवीन प्रसाधनगृह, फलाट पृष्ठभाग सुधारणा, फलाटात प्रवाशांना बसण्याची व्यवस्था, स्थानकातील नामफलक इत्यादी बदल करण्यात येणार आहेत.