राष्ट्रीय सणाला साजेसा पेहराव करा; एसटी कर्मचाऱ्यांना निर्देश

102

केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात घरोघरी तिरंगा अभियानाचे आयोजन केले आहे. एसटी महामंडळातील कर्मचा-यांनी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत या अभियानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश महामंडळाने जारी केले आहेत. या दिवशी कर्मचा-यांनी राष्ट्रीय सणाला साजेसा पेहेराव या काळात करावा, असेही महामंडळाने आदेशात नमूद केले आहे. कर्मचा-यांनी नीटनेटक्या गणवेशात कर्तव्यावर उपस्थित राहावे. तसेच, या उपक्रमाचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील प्रत्येक एसटी कर्मचा-याने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा. त्यासाठी कर्मचा-यांना प्रोत्साहन द्यावे. त्यानुसार, 90 हजार कर्मचारी आपल्या घरावर तिरंगा फडकवणार आहेत. प्रत्येक बस स्थानकाच्या दर्शनी भागात तिरंगा फडकवावा, घरोघरी तिरंगा अभियानासाठी राज्याच्या सांस्कृतिक विभागाने संकेतस्थळावर 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान, विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

( हेही वाचा: स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव! ठाण्यात मॅरेथॉन स्पर्धा; पहिले पारिषोतिक १५ हजार )

आगारांमध्ये प्रदर्शन

मुंबई सेंट्रल, नाशिकमधील ठक्करबाजार, अहमदनगरमधील तारकपूर, सोलापूर सीबीएस, कोल्हापूर सीबीएस, नागपूर मोरभवन, अमरावती सीबीएस आगारात स्वांतत्र्य चळवळीचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यानिमित्त आगारांमध्ये विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.