अमृत स्टेशन योजनेअंतर्गत गोंदिया रेल्वे स्थानकाचा होणारा विकास म्हणजे परिवर्तन आणि लोक कल्याणाच्या दृष्टीने टाकलेले अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. या स्थानकाचा पुनर्विकास करताना समाविष्ट प्रत्येक बाबी प्रवाशांना सुखदायक प्रवासाची अनुभूती देणाऱ्या ठरतील, असे मत खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केली.
अमृत स्टेशन योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांचे विस्तारीकरण आणि सौंदर्यीकरण देशभरात करण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा निवडक रेल्वेस्थानकांमध्ये होणाऱ्या विकासकामाचे भूमिपूजन आभासी पद्धतीने 6 ऑगस्ट रोजी केले. यावेळी गोंदिया रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरण आणि विस्तारीकरण कामाचे भूमिपूजनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले गेले. यानिमित्त गोंदिया रेल्वे स्थानकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार विनोद अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी आमदार रमेश कुथे, संजय पुराम, भाजपा जिल्हाध्यक्ष येशूलाल उपराळे, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, दिनेश दादरीवाल, व्यापारी असोशिएशन अध्यक्ष संजय जैन, व्यापारी फेडरेशन अध्यक्ष किरण मूदडा, जि प सभापती संजय टेम्भरे, गजेंद्र फुंडे, संजय कुलकर्णी, सुनील केलंका, मोनिल जैन, सेवक भाऊ कारामोरे, जसपाल चावला, रेल्वेचे अधिकारी जगताप आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
31 कोटी रुपये खर्च करून या रेल्वे स्थानकाचे सौंदर्यीकरण होत आहे. या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना संबोधित करताना खासदार सुनील मेंढे यांनी अमृत स्टेशन योजनेअंतर्गत समाविष्ट गोंदिया रेल्वे स्थानकाला सौंदर्य करण्यासाठी 31 कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री, रावसाहेब दानवे यांचे आभार मानले. केंद्रातील सरकार लोक कल्याणाचे व्रत घेऊन पुढे जात आहे. प्रत्येक क्षेत्रात भारताने प्रगती करावी या हेतूने राबविण्यात येणा-या विविध योजना आणि उपक्रम देशाचे रूप बदलण्यासाठी पोषक ठरत आहे. सर्व सोयींनी युक्त आणि जागतिक दर्जाची रेल्वे स्थानके भारतात निर्माण व्हावी या हेतूने अमृत स्टेशन योजनेच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांचे सौंदर्य करणारी विस्तारीकरण करण्याचा उपक्रम लक्षावधी प्रवाशांसाठी सुखद धक्का आहे. लवकरच गोंदिया रेल्वे स्थानक एका वेगळ्या रूपात आपल्यासमोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हावडा मुंबई दुरांतो आणि पुरी भुवनेश्वर सुपरफास्ट एक्सप्रेस ला गोंदिया येथे थांबा मिळावा यासाठी आपला आग्रह सुरू असल्याचे ते म्हणाले. रेल्वे प्रवाशांच्या समस्या ओळखून त्या सोडविण्यासाठी सातत्याने आपला आग्रह असून होत असलेले सौंदर्यीकरण वेळेवर पूर्ण होऊन प्रवाशांच्या अपेक्षांवर खरे उतरेल, असेही खासदार सुनील मेंढे म्हणाले. या कार्यक्रमाला गोंदिया सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community