अमूल, मदर डेअरी नंतर आता इतर कंपन्यांचं दूध महागलं!

125

देशातील दोन अग्रगण्य दूधाचे ब्रँड असलेल्या अमूल दूध आणि मदर डेअरीने दुधाच्या किंमतीत प्रतिलीटर २ रूपये प्रतिलिटरने वाढ केली आहे. ही दरवाढ १६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच १७ ऑगस्टपासून करण्यात आली आहे. या दूध दर वाढीनंतर सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार असून आता अमूल, मदर डेअरी नंतर इतर कंपन्यांचं दूध महागणार असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – तब्बल ४ हजार लीटर केमिकलयुक्त दूध जप्त! गुजरातमधून दोघांना अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, अमूल, मदर डेअरी कंपनीने दूधाचे दर वाढल्यानंतर आता इतर खासगी आणि सहकारी दूध उत्पादकांनी घेतला आहे. डिझेल आणि पॅकिंगच्या कच्चा मालाच्या दरवाढीमुळे ही दरवाढ केली जाणार आहे. या निर्णयामुळे गाईचे दूध ५४ रूपये प्रति लीटर तर म्हशीचे दूध प्रति लीटर ६६ रूपयांच्या वर पोहोचले आहे. दरम्यान, गोकूळ दूध महासंघाची २९ सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. कोल्हापुरमधील महासैनिक दरबार हॉलमध्ये ही सभा पार पडणार असून राज्यातील सत्ताबदलाचे पडसाद या सभेत उमटणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

एकीकडे गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दरवाढ होताना दिसत आहे. तर अलिकडच्या काळातच गॅस सिलेंडर, तेल, तसेच भाज्यांचे दरही वाढल्याचे पाहायला मिळाले आहेत. अशातच आता दुधाचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. दरम्यान, देशभरात दूध पुरवठा करणारी सर्वात मोठी कंपनी अमूल आणि मदर डेअरीने दूध दरवाढीचा निर्णय घेतल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर मात्र ताण येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.