Amul Milk: अमूल दूध महागलं, लिटरमागे किती रुपयांची झाली वाढ? जाणून घ्या…

201
Amul Milk: अमूल दूध महागलं, लिटरमागे किती रुपयांची झाली वाढ? जाणून घ्या...

महागाईमुळे सर्वसामान्यांची आधीच वाईट अवस्था झाली असताना सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणारी बातमी समोर आली आहे. अमूलच्या दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल टी स्पेशलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. लिटरमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सोमवारी, (३ जून) सकाळपासून अमूल दुधाचे नवे दर लागू झाले आहेत. (Amul Milk)

अमूल हे भारतातील घराघरांत माहिती असलेले नाव आहे आहे. हा भारतातील सुपर ब्रँडपैकी एक आहे. एवढेच नाही तर भारतात ‘श्वेतक्रांती’ आणण्यातही अमूलचा मोठा वाटा आहे. त्याच्या यशामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर दुग्ध सहकारी संस्थांचा प्रसार झाला आणि राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाची स्थापना झाली. (Amul Milk)

(हेही वाचा – Jitendra Awhad यांच्याकडून सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान)

५०० मिली अमूल म्हशीच्या दुधाचा दर ३६ रुपयांपर्यंत वाढला आहे. त्याचवेळी ५०० मिली अमूल गोल्ड दुधाचा दर ३३ रुपयांवर पोहोचला असून अमूल शक्ती दुधाचा दर ३० रुपयांवर पोहोचला आहे.

एका लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
मिळालेल्या माहितीनुसार, GCMMF ने रविवारी अधिकृतपणे नवीन किमती जाहीर केल्या आहेत. अमूल दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ केल्याने सर्वसामानांच्या खिशावर भार पडू शकतो. अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ ३ जूनपासून लागू झाली आहे. ३ जून रोजी दूध खरेदीसाठी जाणाऱ्यांना प्रतिलिटर दोन रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. त्यामुळे अमूल गोल्डसाठी तुम्हाला ६६ रुपयांऐवजी ६८ रुपये मोजावे लागणार आहेत. अमूल ताजाची किंमत 54 रुपये प्रति लिटर आणि शक्तीची किंमत ६० रुपये प्रति लिटर आहे.

एका दिवसांत किती लिटर दुधाची विक्री
अमूलचे दूध प्रत्येक घरापर्यंत पोहोचवले जाते, मात्र या दुधाच्या वाढत्या दरामुळे गरीब व मध्यमवर्गीयांना फटका बसत आहे. अमूलने दही दरातही वाढ जाहीर केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमूलचे दूध गुजरातव्यतिरिक्त दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल आणि मुंबईच्या बाजारपेठांमध्ये पुरवले जाते. कंपनी एका दिवसात १५० लाख लिटरहून अधिक दुधाची विक्री करते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.