- ऋजुता लुकतुके
अमूल (Amul) हा भारतीय दूग्ध उत्पादनं बनवणारा ब्रँड आता खऱ्या अर्थाने जागतिक झाला आहे. जगातील सर्वात मजबूत अन्नप्रक्रिया उत्पादन ब्रँड म्हणून अमूलची वर्णी लागली आहे. आतापर्यंत अमूलचं भारतात वर्चस्व होतंच. जगातही ही कंपनी हातपाय पसरू लागली होती. आता जागतिक ब्रँड अशी मान्यताही कंपनीला मिळेल. एका अहवालानुसार, अमूल आता जगातील सर्वात मजबूत फूड ब्रँड बनला आहे. ब्रँड फायनान्सच्या अहवालात याला एएए प्लस रेटिंग देण्यात आलं आहे. कंपनीचं ब्रँड मूल्य देखील ३.३ अब्ज डॉलरवर पोहोचलं आहे. कंपनीने मागील वर्षी या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या हर्षेला मागे टाकलंय.
अमूलचा (Amul) इतिहास जवळपास ७० वर्षांचा आहे. ब्रँड फायनान्सच्या ग्लोबल फूड अँड ड्रिंक्स रिपोर्ट २०२४ नुसार, अमूल आता जगातील सर्वात मजबूत फूड ब्रँड बनला आहे. ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्सवर त्याचा स्कोअर १०० पैकी ९१ आहे. याशिवाय, कंपनीला एएए प्लस रेटिंग देखील मिळाले आहे. २०२३ च्या तुलनेत या वर्षी अमूलचे ब्रँड मूल्य ११ टक्क्यांनी वाढून ३.३ अब्ज डॉलर झाले आहे. ब्रँड मूल्याचा कंपनीच्या उलाढालीशी काहीही संबंध नाही. २०२२-२३ या आर्थिक वर्षात अमूलची विक्री १८.५ टक्क्यांनी वाढून ७२,००० कोटी रुपये झाली आहे.
(हेही वाचा – Assembly Election : विधानसभेचा चेहरा उद्धव ठाकरेच, शरद पवारांनी दिले संकेत)
नॉन-अल्कोहोलिक बेव्हरेज क्षेत्रात ‘हा’ ब्रँड पहिल्या क्रमांकावर
ब्रँड फायनान्स अहवालात, अमूलला हर्शी चॉकलेटस् सोबतच एएए प्लस रेटिंग देण्यात आले आहे. पण हर्षीचे ब्रँड व्हॅल्यू ०.५ टक्क्यांनी घसरून ३.९ अब्ज डॉलर झाली आहे. त्यामुळं त्याला यंदाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. दुग्ध व्यवसायात अमूलच (Amul) भारताच्या बाजारपेठेत मोठं नाव आहे. दूध बाजारात अमूलचा वाटा हा ७५ टक्के आहे. लोणी बाजारात ८५ टक्के आणि चीज मार्केटमध्ये ६६ टक्के आहे.
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, नेस्ले हा जगातील सर्वात मौल्यवान फूड ब्रँड म्हणून पुढे आला आहे. त्याचे बाजारमूल्य गेल्या वर्षीच्या तुलनेत ७ टक्क्यांनी घसरले आहे. अंदाजे २०.८ अब्ज डॉलर आहे. तर १२ अब्ज मुल्यांकनासह लेज् हा वेफर्स ब्रँड या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. नॉन-अल्कोहोलिक बेव्हरेज क्षेत्रात कोका-कोला पहिल्या क्रमांकावर तर पेप्सी दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Amul Most Valuable Food Brand)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community