आगामी ३१ मार्च २०२४ पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात मुंबई-हजरत निजामुद्दीन (Nizamuddin Express), राजधानी एक्स्प्रेस (Rajdhani Express) आणि मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेसला (Duronto Express) एक अतिरिक्त वातानुकूलित तृतीय डब्बा जोडण्यात येत आहे. (Indian Railways)
(हेही वाचा – Lok Sabha Elections : महाराष्ट्रातील आठ जागांसह १२ राज्यांमधील ८९ लोकसभा जागांसाठी अधिसूचना जारी)
मध्य रेल्वेने आता या गाड्या कायमस्वरूपी अतिरिक्त वातानुकूलित तृतीय डब्ब्यासह चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 22221 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १ एप्रिल पासून चालवण्यात येईल. गाडी क्रमांक 22222 हजरत निजामुद्दीन – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -राजधानी एक्स्प्रेस हजरत निजामुद्दीन २ एप्रिलपासून चालवण्यात येईल.
गाडी क्रमांक 12289 नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस नागपूर १ एप्रिल २०२४ पासून चालवण्यात येईल. तर गाडी क्रमांक 12290 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -नागपूर दुरांतो एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस २ एप्रिलपासून चालवण्यात येईल. प्रवाशांनी सुविधेचा लाभ घ्यावा आणि ट्रेनमध्ये बसण्यापूर्वी त्यांच्या तिकिटांची स्थिती तपासून घ्यावी असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. (Indian Railways)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community