पूर्व उपनगरातील घाटकोपर (Ghatkopar) यथे ३ मे २०२४ या दिवशी एक अनधिकृत महाकाय जाहिरात कोसळून झालेल्या अपघातात १७ जीव गेले तर ७५ पेक्षा अधिक जखमी झाले. या भीषण अपघाताची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश दिलीप भोसले (Dilip Bhosale) यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला राज्य सरकारने ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा – Cabinet Meeting : पालक सचिवांच्या निष्क्रियतेमुळे मुख्यमंत्र्यांची नाराजी)
घाटकोपर (Ghatkopar) परिसरातील एका पेट्रोल पंपासमोरील १०० फूट उंचीचे होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळले आणि १७ बळी जण पडले. भाडेतत्त्वावर दिलेल्या भूखंडावर इगो मीडियाने हे होर्डिंग उभारले होते. या परिसरात इगो मीडियाचे चार होर्डिंग आहेत, त्यापैकी एक भलेमोठे होर्डिंग ३ मे २०२४ या दिवशी कोसळले. मुंबई पोलिसांनी इगो मीडियाच्या मालकासह या घटनेत सहभागी असलेल्या इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश दिलीप भोसले (Dilip Bhosale) यांच्या अध्यक्षतेखाली समिति नेमली.
या समितीची चौकशी पूर्ण झाली नसल्याने समितीला मार्च अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी ११ फेब्रुवारी २०२५ या दिवशी जारी केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community